IMPIMP

Pune PMC Water Supply News | अर्ध्या पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

by sachinsitapure
Pune PMC Water Supply News | Water supply will be shut off in half of Pune on Thursday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Water Supply News | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने पर्वती सबस्टेश येथे 220/22KV चे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि.10) करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्वती जलकेंद्र Parvati Water Center (जुने व नवीन) व अखत्यारीतील लष्कर जलकेंद्र, एन.एन.डी.टी. MLR (SNDT MLR) पंपींग व वडगाव जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारी या पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Pune PMC Water Supply News) राहणार आहे. तसेच कोथरुड व शिवाजीनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

तर शुक्रवारी (दि.11) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune PMC Water Supply News) होण्याची शक्यता पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे

पर्वती MLR टाकी परिसर – सोमवार पेठ, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

(Parvati) पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर

पर्वती HLR टाकी परिसर – सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द (सर्वे नं. 42,46), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर.

एस.एन.डी.टी. एम. एल. आर. टाकी परिसर – एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी,
गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर, वकील नगर,
पटवर्धन बाग, डीपी रोड, गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड, सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.

चतुःश्रृंगी टाकी परीसर – औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी,
आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी,
औंध गाव परिसर.

लष्कर जलकेंद्र भाग – लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी,
कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर,
महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज,
भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग-2 वरील भाग,
आंबेडकर नगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.

Web Title :  Pune PMC Water Supply News | Water supply will be shut off in half of Pune on Thursday

Related Posts