IMPIMP

Pune Crime News | झुमकार अ‍ॅपवरुन गाडी बुक करुन अपहार व फसवणूक ! चंदननगर पोलिसांकडून पाकिस्तान सिमेजवळून 60 लाखांच्या गाड्या जप्त

by sachinsitapure
Pune Crime News | Fraud and embezzlement by booking a car through the Zumkar app! Chandannagar police seized cars worth 60 lakhs near Pakistan border

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | झुमकार अ‍ॅपवरुन (Zumkar App) गाडी बुक करून अपहार (Embezzlement) व फसवणूक (Fraud) करणाऱ्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. पोलिसांनी राजस्थानमधील (Rajasthan) पाकिस्तान सिमेजवळून (Pakistan Border) 60 लाख रुपये किमतीच्या महागड्या चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सुफीयान जे चौहान Sufiyan J Chauhan (वय-19 रा. फतेहगंज, बी.सी. मिस्त्री कंम्पाउंड, वडोदरा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्राची रोहित पठारे Prachi Rohit Plateau (रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 420, 406,34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपीने फिर्य़ादी यांची एमजी हेक्टर अरोरा गाडी (MG Hector Aurora Car) झुमकार अॅपवर बुक करुन फिर्यादी यांची 20 लाखांची फसवणूक केली होती. (Pune Crime News)

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास करत असताना आरोपी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदौर (Indore) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने इंदौर येथे जाऊन त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असतान त्याने मागील तीन ते चार महिन्यामध्ये झुमकार अ‍ॅपवरती विविध व्यक्तींचे ओळखपत्र अपलोड करुन वाहनं बुक केली. यासाठी त्याने स्वत:च्या आणि मित्रांच्या बँक खात्यातून पैसे जमा केले. त्यानंतर त्याचा साथीदार माहमंद सामा Mahmand Sama (रा. गुजरात) याच्या मदतीने मुंबई पुणे येथून गाड्या घेऊन जात होता. या गाड्यांचा वापर अवैध व्यवसाय करण्यासाठी राजस्थान येथील अनोळखी व्यक्तींना गाडीची विक्री केल्याचे सांगितले.

पोलिसांनी राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातून (Barmer District) फिर्यादी प्राची पठारे यांची 20 लाखांची एमजी हेक्टर कंपनीची गाडी (एमएच 12 टीके 2847) जप्त केली. दाखल गुन्ह्यातील गाडीचा शोध घेत असताना आरोपीने यापूर्वी झुमकारची फसवणूक करुन घेऊन गेलेल्या व राजस्थानात विक्री केलेल्या इतर दोन गाड्या जप्त केल्या. यामध्ये नंदलाल यादव Nandlal Yadav (रा. धानोरी, विश्रांतवाडी, पुणे) यांची 25 लाख रुपये किमतीची टाटा सफारी Tata Safari (एमएच 12 युएफ 3846) आणि प्रकाश महापात्रा Prakash Mohapatra (रा. कोणार्क सोसायटी, वाघोली) यांच्या मालकीची 15 लाख रुपयांची किआ सेल्टोस Kia Seltos (ओडि 2 बीक्यू 7131) जप्त केली. आरोपीने अशाच प्रकारे मुंबईमध्ये गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat), सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील
(ASP Sanjay Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior PI Rajendra Landge),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील (PI Manisha Patil), पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे (PSI Arvind Kumar),
दिलीप पालवे (PSI Dilip Palve), पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर,
श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, विकास कदम
यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | Fraud and embezzlement by booking a car through the Zumkar app! Chandannagar police seized cars worth 60 lakhs near Pakistan border

Related Posts