IMPIMP

Pune PMPML News | बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावरील 7 बससेवा पुर्ववत; विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलचा निर्णय

by nagesh
Pune PMPML News | 7 bus services on Bajirao and Shivaji Roads; PMPML's decision to avoid inconvenience to students and senior citizens

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune PMPML News | विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीक प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलने बाजीराव रस्ता (Bajirao Road) आणि शिवाजी रस्त्यावरील (Shivaji Road) सात बससेवा पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार ( ता. ४ ) पासून ही सेवा पुर्ववत होईल अशी माहीती पीएमपीएलने कळविली आहे. (Pune PMPML News)

 

कात्रज ते शिवाजीनगर (बस क्रमांक २ अ), २० सहकारनगर ते संगमवाडी ( बस क्रमांक २०), स्वारगेट ते सांगवी ( बस क्रमांक २१), ३० मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा ( बस क्रमांक ३०) नतावाडी ते सहकारनगर ( बस क्रमांक ३७), ६८ अप्परडेपो ते सुतारदरा ( बस क्रमांक ६८), मार्केटयार्ड ते पिंपरीगाव ( बस क्रमांक ३५४ ) या मार्गावरील बसेस पुर्वीप्रमाणेच बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरून जातील. शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्‍या या दोन्ही रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पीएमपीएलने जुलै महीन्यात सदर सात मार्गावरील बसेसचा मार्ग बदलला होता. (Pune PMPML News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बाजीराव रस्त्याने जाणार्‍या बसेस जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन कॉलेजरोड मार्गे व
शिवाजी रस्त्याने येणार्‍या बसेस येताना जंगली महाराज रोडने डेक्कन टिळक रोड मार्गे असा बदल गेला होता.
यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक व प्रवाशी नागरिक यांची गैरसोय होऊ लागली होती.
ती दुर करण्यासाठी या सात मार्गावरील बसेस पुर्वीप्रमाणेच बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरून जाणार आहेत.

 

Web Title :- Pune PMPML News | 7 bus services on Bajirao and Shivaji Roads; PMPML’s decision to avoid inconvenience to students and senior citizens

 

हे देखील वाचा :

Sambhaji Bhide | ‘आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो’, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य, महिला आयोगाने घेतली दखल

Pathan Movie Teaser | बहुचर्चित पठाण चित्रपटाचा टीझर आऊट; वाढदिवसानिमित्त शाहरुख खानने दिले चाहत्यांना सरप्राईज गिफ्ट (VIDEO)

Rapper Takeoff | ‘या’ प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या, कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क

 

Related Posts