IMPIMP

Pune PMPML News | मेट्रोला पूरक नळस्टॉप- कर्वेनगर- नळस्टॉप पीएमपी तोट्यात ! 120 अंतर धावूनही केवळ 350 रुपये उत्पन्न

by nagesh
Pune Crime | Bike rider killed in collision with PMPL bus, FIR against bus driver

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMPML News | मेट्रोला पुरक (Pune Metro) म्हणून पीएमपीएलने (PMPML) सुरु केलेली नळस्टॉप- कर्वेनगर – नळस्टॉप या वर्तुळाकार बससेवा तोट्यात असुन, दिवस भर १२० किमी अंतर धावल्यानंतरही या सेवेतून केवळ साडे तीनशे रुपये उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक माहीती पुढे आली आहे. (Pune PMPML News )

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यासंदर्भात सजग नागरीक मंचचे विवेक वेलणकर यांनी माहीती अधिकारात माहीती मिळविली आहे. या माहीतीतुन उत्पन्नाचा आकडा समोर आला आहे. ही बससेवा आता बंद करा अशी मागणी मंचने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचे उद्घाटन मार्च महीन्यात झाले. वनाज ते गरवारे महाविद्यालय यामार्गावर मेट्रो सध्या धावत आहे. या मेट्रोतून प्रवास करणार्‍या प्रवाश्यांची सोय करण्यासाठी मेट्रो सेवेला पुरक अशी नळ स्टॉप – कर्वेनगर- नळ स्टॉप असा वर्तुळकार मार्गावर बससेवा सुरु केली. या मार्गावर आत्तापर्यंत मिळालेल्या प्रतिसादाविषयी वेलणकर यांनी पीएमपीएलकडे माहीती अधिकारात माहीती मागितली होती.

 

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत या मार्गावर बस दिवसभर १२० किमी धावते. परंतु यातून प्रति दिवसाला केवळ साडे तीनशे रुपये इतकेच उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे पीएमपीच्या अनेक मार्गावर प्रवाशांना अर्धा अर्धा तास बसची वाट बघत उभे रहावे लागते, तर या रुट बसच प्रवाश्यांची वाट पाहत असते अशी स्थिती आहे. या मार्गावरील बससेवा तोट्यात असुन, ती थांबविण्यात यावी, सदर बस ही जेथे गरज आहे त्या मार्गावर वापरावी अशी मागणी वेलणकर यांनी पीएमपीएल प्रशासनाकडे केली आहे. (Pune PMPML News )

 

Web Title :- Pune PMPML News | PMPML Even running 120 KM distances yields only Rs 350 Pune Metro PMC News

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | शहरातील नामफलकांबाबत लवकरच नियमावली ! बेकायदा वीज वापरून उभारलेले ‘आय लव्ह’चे बोर्ड हटविणार – पुणे महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! कोकण ट्रिपसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईवर कोयत्याने वार

Jitendra Awhad | ‘शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, कारण…’ – जितेंद्र आव्हाड

 

Related Posts