IMPIMP

Pune Police All Out Combing Operation | पुणे पोलिसांचे ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ ! 3213 जणांच्या तपासणीदरम्यान 33 कोयते, 8 तलवारी, चॉपर जप्त; 13 आरोपींना अटक, 38 केसेस दाखल

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन (Police station) व गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) वतीने ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम (Pune Police All Out Combing Operation) राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन बुधवारी (दि.15) रात्री 11 ते गुरुवारी (दि.16) मध्यरात्री एक या कालावधीत राबवण्यात आले. (Pune Police All Out Combing Operation)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police All Out Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Shivajinagar and Swargate Bus Stop), रेल्वे स्टेशन (Pune railway station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 3213 गुन्हेगारांना चेक कररण्यात आले असून त्यापैकी 817 गुन्हेगार मिळून आले आहेत.

 

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 10 हजार 720 रुपयांचे 33 कोयते, 3700 रुपयांच्या 8 तलवारी, 500 रुपयांचा एक चॉपर जप्त करुन 13 आरोपींना अटक केली आहे. तर 38 केसेस दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई खडक (Khadak Police Station), फरासखाना (Faraskhana Police Station), स्वारगेट (Swargate Police Station), सहकारनगर (Sahakarnagar Police Station), बंडगार्डन (Bundgarden Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), वारजे माळवाडी (Warje Malwadi Police Station), सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station), खडकी (Khadki Police Station), येरवडा (Yerawada Police Station), चंदननगर (Chandannagar Police Station), हडपसर (Hadapsar Police Station), लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station) आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Pune Police All Out Combing Operation)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

गुन्हे शाखा युनिट एकने खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात करण उर्फ ठोम्ब भानुदास आगलावे (वय-18), नामदेव महेंद्र कांबळे (वय-21) याला अटक केली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 हजार रुपये किंमतीचे 10 किलो तांब्याचे पाईप जप्त केले. तर युनिट तीनच्या पथकाने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ जंगल्या राजु भालेवर (वय-25 रा. महादेव आळी, दापोडी गावठाण) याला अटक केली.

गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी पंकज विठ्ठल कांबळे (वय-19, रा. हडपसर) याला अटक करुन एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेऊन हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच युनिट सहाने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कनवरसिंह कालुसिंग टाक (वय-21 रा. हडपसर ) याला अटक केली.

खंडणी विरोधी पथकाने (Anti extortion Cell) विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्या पियुष उर्फ कान्हा सतीश जाधव (वय-19 रा. शिवणे) याला अटक केली. त्याच्याकडून 25 हजार 100 रुपयांचे पिस्टल आणि एक काडतुस जप्त करुन उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अंमली पदार्थ विरोधी पथक (anti narcotics cell) एकने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघांना अटक करुन
त्यांच्याकडून 95 हजार 200 रुपयांचा गांजा आणि एमडीएमए च्या पिल्स जप्त केल्या.
तर पथक दोनने येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 80 हजार रुपयांचा गांजा जप्त करुन एकाला अटक केली.

पोलीस स्टेशनने मुंबई प्रोव्हिबिशन अ‍ॅट अंतर्गत 18 केसेस दाखल करुन 8 आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 15 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सीआरपीसी कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत 102 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच 181 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली.

नाकाबंदी कारवाईमध्ये 754 संशयित वाहन चालकांना चेक करुन 38 जणांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेने 61 दुचाकी, 24 तीन चाकी, 31 चारचाकी आणि एका जड वाहने अशा एकूण 117 जणांवर कारवाई केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Naranvare), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad),पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), पोलीस उपायुक्त वाहतुक विभाग राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,
वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Police All Out Combing Operation | Pune Police’s All Out Combing Operation ! 33 sharp weapons, 8 swords, choppers seized in the investigation of 3213 persons; 13 accused arrested, 38 cases registered

 

हे देखील वाचा :

HM Amit Shah Pune Visit | केंद्रीय मंत्री अमित शाह घेणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

Government Pension Schemes | जर ‘या’ 4 सरकारी पेन्शन योजनांमध्ये केली असेल गुंतवणूक तर निवृत्तीनंतर राहणार नाही टेन्शन; जाणून घ्या किती मिळतो रिटर्न

Sachin Tendulkar-Dharmendra | क्रिकेटचे महागुरू सचिन तेंडूलकर आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांची विमानात झाली अचानक भेट, मास्टर ब्लास्टर रमला वीरेंद्र सेहवागच्या आठवणीत

 

Related Posts