IMPIMP

Pune Police MCOCA Action | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
Pune Police MCOCA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – किरकोळ कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका 18 वर्षाच्या तरुणाचे अपहरण केले. यानंतर त्याला हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केल्या प्रकरणी निखिल विजय कुसाळकर व त्याच्या इतर 5 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) टोळी प्रमुख निखिल विजय कुसाळकर (वय-22 रा. वडारवाडी, दिप बंगला चौक, पुणे), सुबोध अजित सरोदे (वय-20 रा. पांडवनगर, पुणे), ओंकार सोमनाथ हिंगाडे (वय-22 रा. पी.एम.सी कॉलनी, पांडवनगर, पुणे), अभिजीत उर्फ प्रफुल्ल बबन चव्हाण (वय-21 रा. चाफेकर नगर, शिवाजीनगर, पुणे), अयाज रईस उर्फ रईसुद्दीन इनामदार (वय-19 रा. जनवाडी, पुणे), कल्पेश उर्फ पाकुळी रमेश कराळे (रा. गोखलेनगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 364अ, 324, 323, 504, 506/2, 141, 143, 147, 149, सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) कलम 135, 37/1 नुसार गुन्हा दाखल केला असून ओंकार हिंगाडे याला अटक केली आहे. इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा प्रकार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या दरम्यान शेती महामंडळ चौक व जनकवाडी परिसरात घडला होता.

आरोपींनी फिर्यादी तरुणाला यश बोरकर याच्यामार्फत शेती महामंडळ चौकात बोलावून घेतले. फिर्यादी त्याठिकाणी आला असता आरोपींनी तु निशांत डोंगरे सोबत का राहतो, त्याने मला शिवीगाळ केली आहे, असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने अपहरण (Kidnapping) केले. त्याला कॅनॉलच्या बाजुला नेऊन एक तास हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला जनकवाडी येथील आयाज इनामदार याच्या घरी नेले. त्याठिकाणी त्याला पुन्हा बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केला.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव (Pune Police MCOCA Action) करण्याचा प्रस्ताव चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior PI Balaji Pandhare) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी
मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) करीत आहेत.

ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार)
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग
रंजन कुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण
(PI Ankush Chintaman), पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar),
सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण, निगराणी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड,
पोलीस अंमलदार अमित गद्रे, सुहास पवार, दत्तात्रय रेड्डी यांनी केली.

Related Posts