IMPIMP

Pune Police MCOCA Action | पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खून करुन दहशत पसरवणाऱ्या बाबु मिरेकर व त्याच्या 8 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 80 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करून दहशत पसरवणाऱ्या बाबु मिरेकर व त्याच्या इतर 8 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 80 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पूर्ववैमनस्यातून टोळक्याने अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केल्याची घटना हडपसर येथील मिरेकर वस्ती येथे 17 सप्टेंबर रोजी घडली होती. आरोपींनी भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी यांच्या मुलाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. तसेच या टोळक्याने त्यांच्याकडे धारदार लोखंडे हत्यारे हवेत फिरवून, ‘आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर असाच एक एकाचा मुडदा पाडू’, असं ओरडत परिसरात दहशत पसरवली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) आयपीसी 302, 120(ब), 143, 144, 147, 148, 149, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police MCOCA Action)

दाखल गुन्ह्याचा हडपसर पोलीस व गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) युनिट पाच यांनी समांतर तपास करुन टोळी प्रमुख बाबु नामदेव मिरेकर Babu Namdev Mirekar (वय-54), आकाश हनुमंत कांबळे (वय-20 दोघे रा. वैदुवाडी, हडपसर), अमन नवीन शेख (वय-23 रा. गोसावी वस्ती, हडपसर), सरताज नबीलाल शेख (वय-20 रा. वैदुवाडी, हडपसर), सनी रावसाहेब कांबळे (वय-23 रा. मिरेकर वस्ती, शंकर मठ, वैदवाडी), रोहित शंकर हनुवते (वय-22 रा. नवीन म्हाडा बिल्डींग, हडपसर) यांना अटक केली असून त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी आरोपीचे पूर्वीचे रेकॉर्ड (Criminal On Pune Police Records) तपासले असता बाबु मिरेकर याने गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार केली. या टोळीने लोकांना शस्त्राने जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र बाळगून जबर दुखापत करणे, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, खंडणी, छोटे-मोठे व्यवसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन त्यांच्याकडून फुकट वस्तू घेणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींविरुद्ध पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) यांनी
परिमंडळ- 5 पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त
पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Ritesh Kumar),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके,
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (PI Vishwas Dagle), पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivale),
सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप (API Sarika Jagtap), सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर
(API Pramod Dorkar), पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम शेख, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे,
रामेश्वर नवले यांच्या पथकाने केली.

Related Posts