IMPIMP

Pune Police MCOCA Action | महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या अरमान नानावत टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 116 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
IPS Ritesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या अरमान प्रल्हाद नानावत व त्याच्या एका साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 116 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी 13 महिन्याच्या कार्यकाळात पुणे शहरात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार, एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी 100 एमपीडीए तर 116 संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची (Pune Police MCOCA Action) कारवाई करुन अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे.

फिर्यादी महिला चंदननगर परिसरातील संघर्ष चौकातून कपडे खरेदी करण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने फिर्य़ादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख अरमान प्रल्हाद नानावत (वय-22 रा. पोटफोडे वस्ती, सोनी गोडाऊन मागे, वढु-खुर्द) व त्याचा साथीदार ओंकार रामकिसन गायकवाड (वय-20 रा. चाकण रोड, शिक्रापुर) यांना अटक केली आहे. आरोपी अरमान नानावत यांने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवून, जुलुम जबरदस्तीने बेकायदेशीर कृत्य केले आहेत. तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. या टोळीने मागील दहा वर्षात जबरी चोरी, कट रचने अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव, सागर तारु, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांच्या पथकाने केली आहे.

रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोक्का, तडीपार, एमपीडीए या सारख्या कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्तांनी दहशत पसरवणाऱ्या 100 सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तर 116 गुन्हेगारांच्या टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत अशा प्रकारची प्रभावी कारवाई झाली आहे.

Related Posts