IMPIMP

Pune Police MPDA Action | पुणे शहरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 40 वी एमपीडीएची कारवाई

by sachinsitapure
Pune Police MPDA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | कोंढवा आणि समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही 40 वी कारवाई केली आहे. (Pune Police MPDA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वसीम उर्फ लाल रशीद हजारी Wasim alias Lal Rashid Hazari (वय-39 रा. साईबाबा नगर, कोंढवा खुर्द, तसेच ए.पी. लोहीयानगर, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह समर्थ (Samarth Police Station), कोंढवा (Kondhwa Police Station), खडक (Khadak Police Station), वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत कोयता, पिस्टल या सारख्या हत्यांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दरोडा (Robbery), जबरी चोरी (Theft), विनयभंग (Molestation), हत्याराने दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. वसीम उर्फ लाल हजारी याच्यावर मागील 5 वर्षात 8 गुन्हे दाखल आहेत.

आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीवितास व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यास धजावत नव्हते. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी वसीम उर्फ लाल हजारी याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

ही कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane),
पी.सी.बी. गुन्हे शाखा (P.C.B. Crime Branch) पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे (PI Anandrao Khobare) यांनी केली.
पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 40 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title : Pune Police MPDA Action | A staunch criminal who is terrorizing the city of Pune has been arrested! 40th MPDA action by Police Commissioner Ritesh Kumar

Related Posts