IMPIMP

Maharashtra Political News | आजारपणाचं कारण पुढे करणार, शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? – विजय वडेट्टीवार

by sachinsitapure
Maharashtra Political News | congress opposition leader vijay wadettiwar claims ajit pawar to replace eknath shinde as maharashtra cm

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आजारपणाचं कारण देत त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन दरू करण्याचे प्रयत्न आहेत, अशी शंका काँग्रेस नेते (Congress Leader) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Political News) शिंदेंना हटवून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी “त्यांच्या” दिल्ली दरबारी वेगाने हालचाली वाढल्याचे कळतंय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आरोग्याचं कारण पुढे करून त्यांचा राजीनामा (Resignation) घेऊन अजित पवार ह्यांना मुख्यमंत्री करणारं? कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना निलंबित (MLA Suspended) करणार आणि त्यांचा राजीनामा घेणार? काय वाटतं भाजपचा (BJP) काय “प्लॅन” असेल? असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले आहे. (Maharashtra Political News)

विजय वडेट्टीवर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधिमंडळ अधिवेशन (Legislature Session) काळातील सहभागसुद्धा अत्यंत कमी होता. तेरा दिवसांच्या अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत केवळ दोन वेळा गेले, तर विधानसभेत चार वेळा. त्यांची उपस्थितीही दीड-दोन तासांची होती. ही उपस्थिती, त्यांचा सहभाग, सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं टाळणं, आराम करायला बाहेर जाणं, तब्येतीची काळजी घेणं शंकास्पद आहे.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राला त्यांच्या तब्येतीची काळजी असते, त्यामुळे याबाबत खुलासा स्पष्ट होणं अपेक्षित आहे. ते एका पक्षाचे नाहीत तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Web Title : Maharashtra Political News | congress opposition leader vijay wadettiwar claims ajit pawar to replace eknath shinde as maharashtra cm

 

Related Posts