IMPIMP

Pune Police News | पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ‘या’ गोष्टींना असणार प्राथमिकता (Video)

by sachinsitapure
IPS Amitesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | पुण्याचे मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्याकडून नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kuamr) यांनी गुरुवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक समस्या सोडवण्याबरोबरच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच दुचाकीस्वारींनी हेल्मेट वापरणे गरजेचे असून, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अमितेश कुमार यांनी दिला. तसेच हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Pune Police News)

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं. पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणार आहे. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. महिला, महाविद्यालयीन तरुणी, शाळकरी मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देणार आहे. याशिवाय भररस्त्यात कोयते उगारून दहशत माजवणे, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग, तसेच सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करुन उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रॅफ्रिक मॅनेंजमेंट बाबत बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, टॅफ्रिकचा मुद्दा हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. वाहतुकीचे नियमन आणि वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. वाहतूक कोंडी सोंडवण्याठी सर्व प्रयत्न केले जातील. वाहतूक कोंडीची वेळ आहे आणि वाहतूक कोंडी होणारे हॉटस्पॉट शोधून वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक कशी सुरळीत करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

हेल्मेट वापराबद्दल बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, हेल्मेट वापरणे हे अनिवार्य आहे. प्रत्येकाने हेल्मेट वापरलेच पाहिजे. हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येणार. हेल्मेट घालणे हा कायदा असून त्याचे पालन झाले पाहिजे. दुचाकीवरुन जाताना हेल्मेट घालणे आणि चारचाकीमध्ये शीट बेल्ट घालने आवश्यक आहे. ट्रिपल शीट वाहन चालवणे चुकीचे आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे हे देखील चुकीचे आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

Related Posts