IMPIMP

Pune Rains | पुणे शहरात पावसाची दमदार हजेरी ! कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळली; शहरात 15 ठिकाणी झाडपडीच्या घटना

by nagesh
Pune Rains | pain collapses near katraj tunnel in pune tree felling incidents at 15 places

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Rains | पुण्यासह राज्यात जोरदार पावसाची (Pune Rains) रिपरिप सुरू आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी पाहायला मिळाली. तर दुसरीकडे कात्रजच्या (Katraj) जुन्या बोगद्यापासून 300 मीटर अंतरावर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली आहे. तसेच शहरातील अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनाही घडल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काल सकाळपासून देखील शहरातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्याचबरोबर शहरातील तब्बल 15 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पाऊस चांगलाच पडताना दिसत आहे. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, सतत पावसाची रिपरिप असल्याने पाणी कपातीपासून पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Pune Rains)

 

या दरम्यान, सर्वत्र पाऊस अनेक जिल्ह्यांना झोडपडुन काढत आहे.
कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून 300 मीटर अंतरावर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली.
ही माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) आपत्ती विभागाला समजताच, अग्निशामक विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर तात्काळ रस्त्यावरील दरड जेसीबीच्या मदतीने बाजूला केली. त्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title :- Pune Rains | pain collapses near katraj tunnel in pune tree felling incidents at 15 places

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde On Uddhav Thackeray | CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणाले – “आणखी किती जणांना पदावरून हटवणार?”

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट; पेट्रोल-डिझेलचे दरही कमी होणार?

Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटींग; मुंबईसह पुण्यात दिवसभर रिपरिप

 

Related Posts