IMPIMP

Pune Rains Update | पुण्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

by nagesh
Maharashtra Rain | mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Rains Update | गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात जोरदार पाऊस (Pune Rains Update) कोसळताना दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून काही जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार कायम असली तरी आगामी 2 दिवसामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तवण्यात आली आहे.

 

यंदाच्या हंगामामध्ये जून ते 14 जुलैपर्यंत शहरात सरासरीपेक्षा 33 टक्के अधिक पावसाची (Rains) नोंद झाली आहे. मागील महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारली होती. त्यानंतर मात्र जुलै महिन्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी पुणे व परिसरात मध्यम सरी तर घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. परंतु, शनिवारपासून शहर व परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Pune Rains Update)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, शहरात 3 ते 4 दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसाचा गुरुवारी मात्र काहीसा जोर कमी झाला होता. शहरात 10.4 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील 2 दिवसात जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाच्या मुसळधार सरींमुळे दरड कोसळण्याच्या त्याचबरोबर रस्ते खचल्याचे पाहायला मिळाले. तसेच, पावसामुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असून कोंडीतून वाट काढत असताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

 

Web Title :- Pune Rains Update | rain will less in pune city Indian Meteorological Department-IMD

 

हे देखील वाचा :

Shinde Fadnavis Government | ठाकरे सरकारने केलेल्या औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारची स्थगिती, पुन्हा नव्याने निर्णय घेणार

Pune PMC News | महागाईमध्ये जनते सोबतच महापालिकाही भरडतेय ! वीज, पाणीपट्टी पाठोपाठ GST वाढीचा मनपाला फटका; विकासकामांवरील जीएसटी 12 वरून 18 टक्क्यांपर्यंत वाढविला

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिपद न मिळाल्यास शिंदे गटात बंडखोरी होईल, शिवसेना खासदाराचा दावा

 

Related Posts