IMPIMP

Pune River Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पर्यावरण प्रेमींनी घेतलेल्या आक्षेपांचे निरसन शास्त्रोक्त सादरीकरणाद्वारे – पुणे मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे

by nagesh
Pune River Development Project | Radish-Mutha river bank improvement scheme! Resolution of objections raised by environmentalists through scientific presentation - Prashant Waghmare, City Engineer, Pune Municipal Corporation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune River Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाबाबत (Mula Mutha Riverfront Development Project) असलेल्या आक्षेपांबाबत शहरातील पर्यावरण प्रेमी संस्थांच्या (Environmentalist Organizations) प्रतिनिधींनी आज अधिकार्‍यांसमोर सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने या प्रकल्पामुळे नदी प्रवाहात निर्माण होणारे अडथळे, पर्यावरणाची हानी, पूरस्थिती आणि नदी पात्रात सोडले जाणारे सांडपाणी कसे रोखले जाणार याबात विस्तृत सादरीकरण केले. या सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न आणि शंकाबाबत प्रकल्प अहवालामध्ये निश्‍चितच सर्व उपायोजना करण्यात आल्या असून पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेउन प्रशासन त्याअनुषंगाने सादरीकरण करणार आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे (PMC City Engineer Prashant Waghmare) यांनी दिली. (Pune River Development Project)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

मुळा- मुठा नदी काठ आणि नदी सुधार योजनांच्या निविदा नुकत्याच मंजुर झाल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ६ मार्च रोजी या प्रकल्पांचे भुमिपूजनही करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकल्पांबाबत शहरातील पर्यावरण प्रेमी संघटनांनी आक्षेप नोंदविल्याने मागील आठवड्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये (Mumbai) बैठक झाली. या बैठकीला पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांच्यासोबतच खासदार वंदना चव्हाण, दोन्ही महापालिकांचे आयुक्त (PMC Commissioner ) व वरिष्ठ अधिकारी, पाटबंधारे व पर्यावरण विभागाचे सचिव आणि पर्यावरण प्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पांवरील आक्षेपांबाबत जाणून घेउन प्रकल्पाला गती देण्यासाठी एक समिती स्थापन करून पुण्यातच सविस्तर बैठक घेउन आक्षेप जाणून घेउन योग्य सूचनांचा प्रकल्पांत अंतर्भाव करून प्रकल्प पुढे नेण्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचना दिल्या होत्या. (Pune River Development Project)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यानुसार आज कौन्सिल हॉल येथे झालेल्या बैठकीमध्ये शहरातील पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या आक्षेपांबाबत व सूचनांबाबत सादरीकरण केले. या बैठकीला पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता एच.व्ही. गुनाले, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला (Chief Engineer Srinivasa Bonala), अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintending Engineer Yuvraj Deshmukh), सीडब्ल्यूपीआरएसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पंकज जोशी (CWPRS Senior Scientist Pankaj Joshi), डॉ. अन्नपुर्णा पटणे (Dr. Annapurna Patne), पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस.डी. चोपडे (Irrigation Department S.D. Chopde), राज्य प्रदूषण महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी प्रताप जगताप (Pratap Jagtap, Senior Officer, State Pollution Control Board), प्रकल्प अहवाल तयार करणारे गणेश अहिरे, दर्शना सोनी, रथीन गांधी, जलबिरादरी संस्थेचे नरेंद्र चूग, जिवीत नदी संस्थेच्या शैलजा देशपांडे, इकॉलॉजीकल सोसायटीचे गुरूदास नुल्का, सारंग यादवाडकर, प्रदीप पुरंदरे, महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दिघे आदी याबैठकीला उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बैठकी संदर्भात माहिती देताना शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले,
की पर्यावरण प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींनी मुळा- मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाबाबत नदी प्रवाहामध्ये निर्माण होणारे अडथळे,
पूरस्थिती निर्माण झाल्यास निर्माण होणारे धोके, नदी व परिसरातील जैव साखळीवर होणारा परिणाम आदींबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली
तसेच काही आक्षेप नोंदविले. तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर नदी पात्रात मैलापाणी येणार? याबाबतही शंका उपस्थित केल्या.
सर्व पर्यावरण प्रेमींचे सविस्तर म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. त्यांनी घेतलेले आक्षेप हे निरसन करण्याजोगे आहेत.
मुळातच वरिलपैकी बहुतांश बाबींचा समावेश प्रकल्प आराखड्यात करण्यात आला आहे.
पुढील आठवड्यात बैठक घेउन सर्व आक्षेप आणि शंकांचे शास्त्रोक्त सादरीकरण करण्यात येईल.

 

Web Title :- Pune River Development Project | Radish-Mutha river bank improvement scheme! Resolution of objections raised by environmentalists through scientific presentation – Prashant Waghmare, City Engineer, Pune Municipal Corporation

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच घेताना महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’ची रुग्णसंख्या घटली, आज एकही मृत्यू नाही; जाणून घ्या इतर आकडेवारी

Diabetes Management | उत्सवाच्या गोडव्याने वाढत नाहीना रक्तालील गोडवा? होळीपर्वात मधुमेही रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी

 

Related Posts