IMPIMP

Pune Traffic Police | 60 लाख पुणेकरांना कोंडीत अडकवणारे वाहतूक पोलिस अधिकारी निर्धास्त कसे ! बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये कर्तव्यदक्षतेपेक्षा ‘वशिला’ आणि ‘पैसा’च चालतो हा समज पक्का होतोय

by nagesh
 Pune Traffic Updates News | Order issued to stop traffic on Waghapur to Shindwane route; Citizens are urged to use alternative routes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Traffic Police | मागील अडीच ते तीन महिन्यांपासून ६० लाख पुणेकर शहरात अभुतपूर्व वाहतूक कोंडीत
(Traffic Jam In Pune City) अडकत असतानाही वाहतूक शाखेचे उपायुक्त (Traffic DCP) प्लॅनिंगसाठी ‘एकदाही’ रस्त्यावर उतरल्याचे पाहायला
मिळाले नाहीत. नागरीक आणि लोकप्रतिनिधींचा संतापाचा उद्रेक झाल्यानंतर अखेर त्यांच्यावर ‘देखरेख’ करण्यासाठी उच्च पदस्थ अधिकार्‍याची (IPS)
नेमणुक करून सध्यातरी दिलासा देण्यात आला आहे. (Pune Traffic Police)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील अडीच ते तीन महिन्यांपासून पुणे शहरातील रस्त्यांवर श्‍वास कोंडणारी वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती. तीन दिवसांपुर्वी दिवाळी सुरू झाल्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रस्त्यांनीही मोकळा श्‍वास घेतला आहे. दिवाळीसाठीे गावी परतलेले चाकरमानी, विद्यार्थी आणि शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या सलग सुट्टयांमुळे हे वातावरण पाहायला मिळत आहे. या अगोदर अडीच ते तीन महिने मात्र रस्त्यांवर पडलेेले खड्डे, सलग पडणारा पाउस, अस्ताव्यस्त वाहतूक आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी हे दृश्य शहरातील सर्वच रस्त्यांवर पाहायला मिळत होते. अवघे किलोमीटर अंतर जाण्यासाठी वाहनांना दीड ते दोन तास लागत होते.

 

महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) पावसाने उसंत घेताच अनेक ठिकाणचे खड्डे बुजविले. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली. रस्त्यांच्या सदोष कामांना कारणीभूत ठरणार्‍या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून कडक पावले उचलली. परंतू या कालावधीत वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच जाणवत नव्हते. मोठ्या चौकांमध्ये शेकडो वाहने कोंडीत अडकून पडली तरी कोंडी सोडविण्याची अपेक्षा असताना वाहतूक पोलिस आडोश्याला ‘सावज’ शोधण्यात गुंतलेले होते. (Pune Traffic Police)

 

गणेशोत्सवामध्ये दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे वाहतूक पोलिसांनी केले. मात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कुठल्याही पद्धतीचे नियोजन केले नसल्याचे पाहायला मिळाले. अगदी लक्ष्मी रस्ता (Laxmi Road), बाजीराव रस्ता (Bajirao Road), टिळक रस्ता (Tilak Road), शिवाजी रस्त्यांच्या (Shivaji Raod) कडेला लागलेल्या रिक्षांच्या रांगा, बसस्थानकांभोवती बेकायदेशीररित्या सीट वाहतूक करणार्‍या रिक्षांचे थवे, मोठ्या हॉटेल्स आणि मॉल्सच्या परिसरातील निर्बंध असलेल्या रस्त्यांवर मोटारींचे बेकायदा पार्किंग, जड वाहतूकीला बंदी असलेल्या रस्त्यांवर दिवसाढवळ्या जड वाहनांची वाहतूकीने अभुतपूर्व कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. एवढे सारे काही होत असताना ज्यांच्यावर शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी आहे, ते वाहतूक पोलिस उपायुक्त आणि प्रशासन व प्लॅनिंग पोलिस अधिकारी रस्त्यावर उतरल्याचे एकदाही पाहायला मिळाले नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माध्यमांमधून याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत होता. पालकमंत्र्यांना लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन बैठकीत याच मुद्दयांवरून धारेवर धरले. विरोधकांनी वाहतूक कोंडीविरोधात आंदोलनही केले. भाजपकडे राज्याचे गृहखाते आहे. त्याच भाजपचे शहर अध्यक्ष वाहतूक कोंडी सोडवावी याचे निवेदन देण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे गेले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे पत्र पोलिसांना दिले. पोलिस आयुक्तांनी तात्काळ वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या डोक्यावर देखरेख करण्यासाठी उच्च पदस्थ अधिकार्‍याची नमणुक केली. तसेच दिवाळीचे आठ दिवस पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनीही वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे आदेश देत मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. यामुळे दोन-तीन दिवसांपासून वाहतूक कोंंडी सुटण्यास मदत झाली.

 

परंतू सलग अडीच ते तीन महिने साठ लाख पुणेकरांना कोंडीत अडकवणार्‍या वाहतूक पोलिस अधिकार्‍यांवर मात्र कुठलिही कारवाई झालेली नाही.
पोलिस दलामध्ये कानोसा घेतल्यावर वाहतूक पोलिस उपायुक्तांची अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारकडूनच (MVA Govt) वाहतूक शाखेमध्ये नियुक्ती झालेली आहे.
राज्य सरकारकडूनच नेमणुक झाल्यामुळे पोलिस आयुक्तांना त्यांच्याविरोधात कारवाई करता येत नाही.
आयुक्तांनी तीन महिन्यांपुर्वी राज्य सरकारला वाहतुक पोलिस अधिकार्‍यांच्या तक्रारीबाबत कळविले आहे.
परंतू सत्तांतरानंतरही या अधिकार्‍याची या विभागातून बदली होउ शकलेली नाही.
यामुळेच सरकार कुठलेही असो ‘वशिला’ आणि ‘पैसा’ यावर अधिकार्‍यांच्या बदल्या आणि नियुक्त्या केल्या जातात, हा समज पक्का झाल्याचे पुणेकरांच्या चर्चेतून पुढे येत आहे.

 

वाहतुक शाखेत गेल्या वर्षभरापासून सावळा गोंधळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
वाहतूक शाखेतील अधिकार्‍यांनी ‘मलिदा’ घेवून डिव्हीजन बहाल केल्याची चर्चा देखील ऐकावयास मिळत आहे.
आगामी काळात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून संबंधित अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Traffic Police | How are the traffic police officers who have trapped 60 lakh Pune residents in a dilemma? The perception that ‘Vasila’ and ‘Money’ are more important than conscientiousness in transfers and appointments is getting stronger

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | खडसेंवरील ‘झोटिंग समिती’चा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची गिरीश महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंचे गणित बहुतेक कच्चे आहे, ते 25 हजारांना 50 हजार म्हणत आहेत, चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला

Deepak Kesarkar | मनसे-शिंदे-भाजप महायुती होणार का? – दीपक केसरकर म्हणाले…

 

 

Related Posts