IMPIMP

Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंचे गणित बहुतेक कच्चे आहे, ते 25 हजारांना 50 हजार म्हणत आहेत, चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला

by nagesh
 Pune Kasba Bypoll Election | kasaba peth assembly bypoll who will become congress candidate 16 name in race

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) टीका करत आहेत. आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंचे गणित कच्चे आहे, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2019 साली महिनाभर सरकार अस्तित्वात नव्हते. त्यावेळी ठाकरेंना शेत माहीत नव्हते, बांध माहीत नव्हता. त्यावेळी ते अतिवृष्टीमुळे गावोगाव फिरले आणि शेतकऱ्यांना आश्वस्त करत मागणी केली की, हेक्टरी 25000 मदत त्यांना मिळाली पाहिजे. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाले. पण पुढील अडीच वर्षात ही मदत मिळाली नाही. त्यामुळे 25000 हेक्टरी मदत मागितल्याचे उद्धव ठाकरे विसरले आहेत, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

 

तसेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आलेल्या सरकारने शेतकऱ्यांकडे करुणेच्या नजरेतून पाहिले आहे.
आम्ही जूनपासून शेतकऱ्यांवर आलेल्या प्रत्येक संकटाची पाहणी केली आणि पंचनामे केले.
तसेच प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची आणि पिकाची पाहणी करुन त्यांना नुकसान भरपाई दिली आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला दुप्पट नुकसान भरपाई दिली आहे. उद्धव ठाकरेंचे गणित बहुतेक कच्चे आहे. ते 25 हजार विसरले, आता ते 50 हजार म्हणत आहेत. ते त्यांनी त्यांच्या काळात का नाही दिले, असा प्रश्न पाटलांनी उपस्थित केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp chandrakant patil mocks uddhav thackeray shivsena wet draught

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | मनसे-शिंदे-भाजप महायुती होणार का? – दीपक केसरकर म्हणाले…

Shambhuraj Desai | राष्ट्रवादी सत्तेविना तळमळत आहे पण त्यांना पुढील 15 वर्षे…, शंभुराज देसाई यांचा राष्ट्रवादीला सणसणीत टोला

CM Eknath Shinde | ‘नथुराम’च्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले, शरद पोंक्षेंनी CM शिंदेंसमोर सांगितल्या अनेक आठवणी

 

Related Posts