IMPIMP

Pune Vishrantwadi Crime | सोशल मीडियात तरुणींशी मैत्री करून देण्याचे आमिषाने तरुणाला लुटणारी टोळी अटक

by sachinsitapure
Arrest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Vishrantwadi Crime | सोशल मीडियातून तरुणींशी मैत्री करून देण्याचे आमिष दाखवून तरुणाला लुटणार्‍या चोरट्यांच्या टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. (Social Media Friends)

अमन अजीज शेख (वय २२, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), मजहर जुबेर खान (वय २४, रा. महाराष्ट्र हौसींग बोर्ड, नागपूर चाळ येरवडा), दीपक शांताराम कांबळे (वय २३, रा. जाधवनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका २२ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आळंदीत राहायला आहे. आरोपींनी त्याला सोशल मीडियावर मैत्रीची विनंती पाठविली. तरुणाशी आरोपींनी ओळख वाढविली. तरुणींशी मैत्री करून देतो, असे आमिष दाखवून त्याला जाळ्यात ओढले. (Vishrantwadi Police Station)

त्यानंतर तरुणाला विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या पाठीमागे असणार्‍या मैदानात बोलाविण्यात आले. तरुणाला शिवीगाळ, करून त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्याच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ४३ हजार रुपये काढून घेतले. मोबाइल चोरून आरोपी पसार झाले. पोलिसांकडे तरुणाने तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. आरोपी शेख, खान, कांबळे यांनी तरुणाला लुटल्याची माहिती खबर्‍याने पोलीस कर्मचारी शेखर खराडे आणि संदीप देवकाते यांना दिली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, संपत भोसले, संजय बादरे, संदीप देवकाते, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, किशोर भुसारे, अनिल भारमळ, अक्षय चपटे यांनी केली.

Related Posts