IMPIMP

Pune Yerawada Crime | गावठी दारुची भट्टी लावणार्‍या महिलेला अटक ! 3 हजार लिटर रसायन केले जप्त

by sachinsitapure
arrest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Yerawada Crime | येरवडा येथील नाईकनगरमधील घरात गावठी दारुची भट्टी लावून दारु तयार करणार्‍या महिलेला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. तिने तयार केलेले १ लाख ३४ हजार रुपयांचे ३ हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. (Pune Yerawada Crime)

रुक्मिणी शंकर राठोड (वय ५०, रा. नाईकनगर, येरवडा)असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. शोभा हिरा राठोड (वय ३५) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागातील (SS Cell Pune) पोलीस शिपाई संदीप कोळगे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ७८/२४) दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्मिणी व शोभा राठोड यांनी नाईकनगर येथील राहत्या घरात हातभट्टी दारु तयार करण्यासाठी भट्टी लावली. त्यातून ३ हजार लिटर रसायन तयार करुन हातभट्टी दारु विक्रीसाठी तयार केली होती. सामाजिक सुरक्षा विभागाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी येथे छापा टाकून हातभट्टी उद्धवस्त केली. पोलीस उपनिरीक्षक मुंढे तपास करीत आहेत. (Pune Crime Branch)

Related Posts