IMPIMP

Punit Balan – Kedar Jadhav Cricket Academy | पुणे शहरामध्ये ‘पुनीत बालन – केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी’च्या आरंभाची घोषणा

by nagesh
Punit Balan - Kedar Jadhav Cricket Academy | Puneet Balan Kedar Jadhav Cricket Academy announced in Pune city

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPunit Balan – Kedar Jadhav Cricket Academy | पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनित बालन (Punit Balan) आणि भारतीय क्रिकेटर केदार जाधव (Kedar Jadhav) यांनी एकत्रितरित्या ‘पुनीत बालन – केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी’ ची पुणे शहरामध्ये सुरूवात करत असल्याची घोषणा आज रोजी केली. (Punit Balan – Kedar Jadhav Cricket Academy)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत अधिक माहिती देताना पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनीत बालन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव यांनी सांगितले की, पुणे शहराला क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा आहे. या शहराने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू निर्माण केले आहेत. पुण्यातील युवा आणि गुणवान खेळाडूंना आपल्या गुणकौशल्याचा विकास करून त्यांना आपली कारकिर्द घडवण्याच्या हेतूने या अ‍ॅकॅडमीची सुरूवात करण्यात येत आहे. ही अ‍ॅकॅडमी सध्या कोथरूड येथे सुरू असून पुनीत बालन ग्रुपने या अ‍ॅकॅडमीला सक्रीय पाठींबा दिला असून ‘पुनीत बालन – केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी’ या नव्या पर्वाची सुरूवात होत आहे. (Punit Balan – Kedar Jadhav Cricket Academy)

 

पुनीत बालन यांनी सांगितले की, पुनीत बालन ग्रुप आणि क्रिकेट याचा फार जवळचा संबंध आहे. पुण्यातील क्रिकेट क्षेत्रामध्ये पुनीत बालन ग्रुपच्यावतीने १२, १४ आणि १७ वर्षाखालील मुलांसाठी, मुलींसाठी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील खेळाडूंसाठी अनेक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. आणि आता पुनीत बालन ग्रुपच्यावतीने क्रिकेटची अ‍ॅकॅडमी सुरू करण्यात येणार आहे. तसेच सायकलिंग, तायक्वांदो, शुटिंग, खो – खो, लॉन टेनिस, हँडबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस या क्रिडाप्रकारातील खेळाडूंना आर्थिक पाठींबा दिला जातो.

 

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि महाराष्ट्र रणजीपटू केदार जाधव यांनी सांगितले की, मी माझ्या क्रिकेटचा श्री – गणेशा पुण्यातूनच केला आणि येथूनच माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरूवात झाली. क्रिकेटचे धडे घेत मी भारतीय क्रिकेट संघापर्यंत पोहोचलो. क्रिकेटच्या दोन फॉरमॅटमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय सामने तसेच एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही खेळलो. या अ‍ॅकॅडमीमधून असे अनेक गुणवान खेळाडू घडावे आणि त्यांना त्यांची ‘इनिंग’ खेळायची संधी मिळवी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या वाटचालीमध्ये आमच्या या अ‍ॅकॅडमीचा महत्वाचा वाटा असेल, असा विश्‍वास मला वाटतो.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नामांकित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना मार्गदर्शन करणे.
विविध प्रकारचे ट्रेनिंग आणि शारीरिक विकासासाठीचे प्रशिक्षण देणे.
१२, १४, १७ तसेच युवा खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळवून देणे.
मुलांसोबतचे मुलींच्या क्रिकेटलाही प्रोत्साहन देणे. याबरोबरच अंध आणि दिव्यांग खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे.

 

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणार्‍या आणि गरजू खेळाडूंना पाठिंबा देणे.
तसेच स्थानिक खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांना स्पर्धात्कम विश्‍वाचा अनुभव प्राप्त करून देणे, अशी आमच्या अ‍ॅकॅडमीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पुनीत बालन आणि केदार जाधव यांनी सांगितले.

 

Web Title :- Punit Balan – Kedar Jadhav Cricket Academy | Puneet Balan Kedar Jadhav Cricket Academy announced in Pune city

 

हे देखील वाचा :

Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ ! सोलापुरमध्येही गुन्हा दाखल

Pune Crime | धुम स्टाईलने चैन स्नॅचिंग करणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, लाखोचा मुद्देमाल जप्त

RSS Leader Indresh Kumar In Pune | देशात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे : इंद्रेश कुमार

 

Related Posts