IMPIMP

Pune Crime | धुम स्टाईलने चैन स्नॅचिंग करणारी आंतरराज्यीय टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, लाखोचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरामध्ये धूम स्टाईलने (Dhoom Style) चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करणाऱ्या
आंतरराज्यीय टोळीला (Interstate Criminal Gang) गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या (Crime Branch Unit 5) पथकाने सापळा रचून अटक
(Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सहा गुन्हे (Pune Crime) उघडकीस आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी संजय रामब्रिज सहाणी (Sanjay Ram Brij Sahani), दिपककुमार अभय सिंग (Deepak Kumar Abhay Singh) यांना अटक केली असून
आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहरामध्ये (Pune Crime ) चैन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग (Bag Lifting) आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये (Vehicle Theft) वाढ होत आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे वाढत असल्याने गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. सोमवारी (दि.18) पथकातील पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, होळकरवाडी (Holkarwadi) येथे राहणाऱ्या दोघांनी पल्सर गाडी चोरली असून गाडीची पुढील नंबर प्लेट काढून मंतरवाडी (Mantarwadi) भागात फिरत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मंतरवाडी भागात सापळा रचून संजय रामब्रिज सहाणी (वय – 21 रा. मु. पो. गोहारपुर, ठाणा पुरंदरपुर, ता. नौतनवा, जि. महाराजगंज उत्तर प्रदेश – Uttar Pradesh) आणि दिपककुमार अभय सिंग (वय – 21 रा. मु. पो. मोदागोल वस्ती, सितामढी, बिहार – Bihar सध्या रा. होळकरवाडी, ता. हवेली) यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी हडपसर भागात दोन चैन स्नॅचिंग, एक बॅग लिफ्टिंग व तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

गुन्हे करण्याची पद्धत
अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतर राज्यात (Other States) विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे प्रत्येक वर्षी नवीन राज्यात जाऊन पहिल्यांदा त्या ठिकाणी मिळेल ते काम करत होते. काम करत असताना त्या भागाची पाहणी करत होते. त्यानंतर आरोपी गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare), पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, विनोद शिवले, चेतन चव्हाण यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Inter state gang involved in chain snatching Arrested Pune Police Crime Branch

 

हे देखील वाचा :

RSS Leader Indresh Kumar In Pune | देशात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे : इंद्रेश कुमार

Pune Police | फसवणूकीचा FIR दाखल करण्यासाठी एक लाख घेतले तर आरोपींच्या अटकेसाठी 5 लाखाचा ‘आवाज’, पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी निलंबीत; जाणून घ्या प्रकरण

Kidney Cure | किडनी डिटॉक्स करतात ‘हे’ 3 ड्रिंक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

 

Related Posts