IMPIMP

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

by nagesh
Purandar Upsa Irrigation Scheme | Purandar Upsa Irrigation Scheme pipeline work completed in just 40 days

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनबारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मोरगाव (Shri Kshetra Morgaon) येथील पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या (Purandar Upsa Irrigation Scheme) 3.9 किमी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. हे काम केवळ 40 दिवसात पूर्ण करण्यात आले आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये (Purandar Upsa Irrigation Scheme) जोगवडी ते खटकळ ओढा, ढोले मळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा (Water Supply) होणार आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी 8 मार्च रोजी 1.32 कोटी C.S.R.फंडातून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांच्या सहकार्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पाईपलाईनचे काम पुर्ण करणेसाठी मोरगाव येथील शेतकरी अनिल ढोले, चांगदेव ढोले, गणेश ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले, विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, विजय ढोले, नारायण तावरे, विलास तावरे, महादेव ढोले ,अभिजीत ढोले तसेच मोरगावचे विद्यमान सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष कष्ट घेतले होते. या योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर, सोनारशेत येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

 

या योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे. सदर योजनेकामी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी संदीप शंकरराव कदम (Sandeep Shankarrao Kadam) उपायुक्त पुणे महानगरपालिका (Deputy Commissioner Pune Municipal Corporation (PMC) यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले आहे. या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन पुरूषोत्तम जगताप (Purushottam Jagtap) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर (Taluka President Sambhaji Nana Holkar) यांच्या हस्ते झाले होते.

 

पुरंदर उपसा सिंचन योजनेचे (Purandar Upsa Irrigation Scheme) काम दिनांक 18 जुन 2022 रोजी पुर्ण झाले
असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले (Avinash Dhole) व सर्व ग्रामस्थ यांचे उपस्थित खटकळ ओढयात पाणी सोडण्यात आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
तसेच त्यांनी  अजित पवार यांचा नुकतेच मुंबई येथे जाऊन सत्कार केला व आभार व्यक्त केले आहेत.
तसेच सिंचन विभागातील मुख्य अभियंता गुणाले व इतर अधिकारी त्यांचेही आभार मानले आहेत.

 

Web Title :- Purandar Upsa Irrigation Scheme | Purandar Upsa Irrigation Scheme pipeline work completed in just 40 days

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत

Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा – IMD

 

Related Posts