IMPIMP

Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा – IMD

by nagesh
Maharashtra Rains | maharashtra weather update extreme heavy rainfall in konkan orange alert marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains | मागील काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी पावसाने (Maharashtra Rains) जोर धरला आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कोकण (Konkan) पुण्यासह (Pune) काही भागात पावसाची रिपरिप दिसून आली आहे. काही ठिकाणी पेरणीची लगबगही सुरू झाली आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात अजून म्हणावा तसा पावसाचा जोर नसल्याने पेरण्यांची घाई करू नये असं शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department-IMD) राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) आगामी तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अलर्ट (Alert) देखील जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये आगामी तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल असा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात 24 आणि 25 तारखेला यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rains)

 

दरम्यान, मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
उपनगरातही पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. पण, म्हणावा तसा अजून आला नाही.
त्यामुळे काही जिल्ह्यांना अजुन पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे. तर दुसरीकडे विदर्भात देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली.
काही ठिकाणी पावसामुळे नुकसानही झालं आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | maharashtra weather update extreme heavy rainfall in konkan orange alert marathi news

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | ‘दिघे साहेब असते तर गद्दारी…’ एकनाथ शिंदेंच्या बंडावर आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया

MNS On Uddhav Thackeray | ’21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, ‘वर्षा’तला शेवटचा दिवस ?’ – मनसे

Shalini Thackeray | ‘पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले, आता कोण एकटे पडले’ – शालिनी ठाकरे

 

Related Posts