IMPIMP

Raghvendra Bapu Mankar Medical Foundation | गिरीश बापट आणि संदीप आठवले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण; राघवेंद्र बापू मानकर मेडिकल फाउंडेशनचा उपक्रम

by nagesh
 Raghvendra Bapu Mankar Medical Foundation | Inauguration of ambulance in memory of Girish Bapat and Sandeep Athawale; An initiative of Raghavendra Bapu Mankar Medical Foundation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Raghvendra Bapu Mankar Medical Foundation | खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनी केलेल्या समाज व लोकोपयोगी कामांचा वारसा पुढे चालविला पाहिजे. बापू मानकर (Bapu Mankar) यांनी रुग्णवाहिका सुरु करून बापट यांच्या मनातील गोष्ट साकारली आहे , असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रविवारी व्यक्त केले. (Raghvendra Bapu Mankar Medical Foundation)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राघवेंद्र (बापू ) मानकर मेडिकल फाउंडेशनतर्फे खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक संदीप आठवले (Sandeep Athawale) यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली .या कार्यक्रमात पाटील प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते खासदार बापट यांच्या पत्नी गिरिजा बापट (Girija Bapat), मुलगा गौरव बापट (Gaurav Bapat), तसेच प्रकाश आठवले (Prakash Athawale) आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. (Raghvendra Bapu Mankar Medical Foundation)

 

पाटील म्हणाले , बाबत यांचा लोकसंपर्क आणि कार्य मोठे होते .तिघाचौघांनी मिळून ते पुढे नेले पाहिजे. त्यातील एक नाव हे बापू मानकर यांचे आहे . बापट यांचा वारसा पुढे नेण्याचे काम मानकर व त्यांचे सहकारी करतील.

 

गौरव बापट म्हणाले मी लहानपणी संघाच्या शाखेवर जात होतो तेव्हा संदीपजी आठवले आमचे शिक्षक होते .त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात झोकून दिले. आठवले आणि माझे बाबा यांच्या स्मरणार्थ मानकर यांनी ही रुग्णवाहिका लोकार्पण केली . त्याबाबत त्यांना मी धन्यवाद देतो.

 

बापू मानकर म्हणाले बापट यांच्या सानिध्यात गेल्या आठ नऊ वर्षे असताना त्यांनी आम्हाला विविध बाबतीत मार्गदर्शन केले. कोरोना साथीच्या काळात वैद्यकीय अडचणी जाणवल्या त्यामुळे बापट आणि आठवले यांच्या स्मरणार्थ फाउंडेशनच्या वतीने आम्ही रुग्णवाहिका लोकार्पण केली .

 

प्रकाश आठवले म्हणाले संदीपजी आठवले यांनी कोकण ,कोल्हापूर येथे प्रचारक म्हणून काम केले. मुंबईत संघाचे प्रांत प्रचार म्हणून काम पाहिले. गेले साठ वर्षे बापट आणि आठवले यांचे कौटुंबिक संबंध आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमित कंक (Amit Kank) यांनी सूत्रसंचालन केले. फाउंडेशनच्या वतीने सोमनाथ भोसले (Somnath Bhosale) यांनी आभार मानले.

 

 

Web Title :-  Raghvendra Bapu Mankar Medical Foundation | Inauguration of ambulance in memory of Girish Bapat and Sandeep Athawale; An initiative of Raghavendra Bapu Mankar Medical Foundation

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंकडून मोदींचा एकेरी उल्लेख, बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘बोलताना जरा तारतम्य बाळगा’ (व्हिडिओ)

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

Ajit Pawar | ‘मविआत शक्य नाही, अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्यासोबत यावे’, केंद्रीय मंत्र्याची ऑफर

Pune University – SPPU News | अश्लील रॅप साँग शूट केल्याचा अभाविपचा आरोप, पुणे विद्यापीठात तोडफोड (व्हिडिओ)

 

Related Posts