IMPIMP

Railway IRME Exam-UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोगावर मोठी जबाबदारी; आयोजित करणार रेल्वे भरतीच्या ‘या’ परीक्षा

by nagesh
Railway IRME Exam-UPSC |Now Indian Railway Management Exam (IRME) of railway will b taken by upsc big decision by government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Railway IRME Exam-UPSC | रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) मोठी जबाबदारी दिली आहे. यापुढे रेल्वे मंत्रालयाच्या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाला आयोजित कराव्या लागणार आहेत. 2023 मध्ये रेल्वे मंत्रालयाची परीक्षा होणार आहे. तिच्या आयोजनाचा भार केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे देण्यात आला आहे. (Railway IRME Exam-UPSC)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा भरती खास तयार केलेल्या परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यात प्राथमिक स्क्रीनिंग परीक्षा आणि त्यानंतर मुख्य लेखी परीक्षा तसेच मुलाखत असणार आहे. मंत्रालयाच्या एका निवेदनानुसार, पात्र उमेदवारांना परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (मुख्य) लेखी परीक्षेत बसण्यासाठी अगोदर नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेस बसावे लागेल. (Railway IRME Exam-UPSC)

 

या परीक्षेला पात्रता पेपर आणि वैकल्पिक विषयासाठी भाषा माध्यम तसेच लिपी सीएसई (मुख्य) सारखीच
असणार आहे. वयोमर्यादा आणि उमेदवाराला परीक्षेला बसण्याचा पर्याय सीएसईप्रमाणेच असेल.
भारतीय रेल्वे व्यवस्थापकीय सेवा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता म्हणून अभियांत्रिकी,
वाणिज्य किंवा चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी असणे आवश्यक आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग गुणवत्तेच्या क्रमाने चार विषयांनुसार अंतिम यादी तयार करणार आहे.
सीएसई आणि आयआरएमएसई या दोन्हींसाठी प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेच्या फेऱ्या एकाच वेळी घेतल्या जातील.

 

Web Title :- Railway IRME Exam-UPSC | Now Indian Railway Management Exam (IRME) of railway will b taken by upsc big decision by government

 

हे देखील वाचा :

Pune Crime | स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; पुण्यातील घटना

Dhondi Champya Trailer | भरत जाधव-वैभव मांगलेची तुफान कॉमेडी असलेला ‘धोंडी चंप्या; एक प्रेम कथा’चा ट्रेलर प्रदर्शित

Nana Patekar | ‘हे फक्त नितीन गडकरीच करू शकतात’ – नाना पाटेकर

 

Related Posts