IMPIMP

Rain in Maharashtra | राज्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

by nagesh
Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rain in Maharashtra | राज्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा चटका लागला आहे. वाढत्या तापमानामुळे
गरमी वाढली आहे. दिवसभरात वातावरणात बदल होतानाही दिसत आहे. मात्र आता महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाची (Rain in Maharashtra)
शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department (IMD) वर्तवण्यात आली आहे. येत्या 21 ते 23 एप्रिलपर्यंत राज्यातील अनेक भागात वारा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली. (Chance of heavy rain with thunderstorms)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत 21 आणि 22 तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस (Rain in Maharashtra) कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. 23 तारखेलाही यापैकी काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

 

 

महाराष्ट्रात 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological Department (IMD) वर्तवली आहे. जोरदार पडणाऱ्या अवेळी पावसाचा फटका पिकांना बसू शकतो. तसेच देशातील आसाम आणि मेघालय राज्यात पावसासह गारपीठ होईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Rain in Maharashtra | Rain in Maharashtra with thunderstorm on 21st and 22nd in Ratnagiri, Sindhudurg, Sangli, Kolhapur, Pune, Solapur, Osmanabad, Latur and Nanded districts

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गांजा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 4 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त

Narayan Rane | ‘हे तीन पक्षांचं सरकार…’; नारायण राणेंनी सांगितला ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहूर्त

Pune Police | अवैध धंद्यांची वसुली करणे पडले महागात, पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी निलंबीत

 

Related Posts