IMPIMP

मनसेचा यंदाचा वर्धापन सोहळा रद्द पण राज्यात सुरु होणार ‘ही’ मोहीम

by bali123
mns anniversary celebrations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यानुसार, 9 मार्चला होणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन ( mns anniversary celebrations ) सोहळा रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन दरवर्षी 9 मार्चला साजरा केला जातो. गेल्या वर्षी हा सोहळा वाशी येथील एका सभागृहात झाला होता. मात्र, आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बंधने आणली गेली आहेत. त्यानुसार गर्दीवर मज्जाव घातला जात आहे. त्यानंतर आता मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आलाची माहिती दिली आहे. मात्र, 9 मार्च रोजी राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते मनसे सदस्य मोहिमेला सुरुवात करणार आहेत. पक्षसदस्य नोंदणीचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सदस्य नोंदणी सुरु होईल, त्यामुळे गर्दीचा प्रश्न उपस्थित होणार नाही.

भाषणाचे नियोजन नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे अद्याप भाषणाबाबत काही नियोजन नाही, असेही नितीन सरदेसाई यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शेतकरी आंदोलनामुळे ते अद्याप या दौऱ्याचे नियोजन झाले नाही. त्याबाबत 1-2 दिवसांत तारीख निश्चित करतील, असे मनसेकडून सांगितले जात आहे.

Related Posts