IMPIMP

Raj Thackeray | ‘आतापर्यंतची आपण ऐकलेली ती सर्व काल्पनिक नावं आहेत’; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबद्दल राज ठाकरेंनी दिलेली माहिती शरद पवारांना मान्य?

by nagesh
Raj Thackeray | raj thackeray comment on vedant marathe veer daudale saat move in kudal

कुडाळ : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आज (१ डिसेंबर) राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांबाबत झालेल्या वादावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “आपण जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. सध्या लोकांना जातीतून इतिहास पाहण्याची सवय झाली आहे. ठराविक मूठभर लोकच असं करत आहेत. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे.” त्यांचा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आणि ‘हर हर महादेव’ या चित्रपटांचा निषेध केला होता. या चित्रपटांतून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात दाखवण्यात आलेले सहा मराठ्यांचे नाव चुकवण्यात आले आहे, असा दावा अनेकांकडून होत आहे. त्यासंबंधीही राज ठाकरे यांनी त्यांचे मत मांडले.

 

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या चित्रपटाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या चित्रपटातील सहा मराठ्यांची नवे चुकीची आहेत, असा आरोप होऊ लागल्यानंतर राज ठाकरेंनी इतिहास तज्ज्ञांशी चर्चा केली होती. त्यांनी याबद्दल आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, “मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतूहल वाटतं तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे.” राज ठाकरे इतिहासतज्ज्ञ गजानन मेहंदळे यांना भेटले. मेहंदळेंना राज ठाकरेंनी या प्रकरणाबाबत विचारले.

 

ठाकरे म्हणाले, “गजाननराव म्हणजे इतिहासाचे दाखले आणि संदर्भ याचे अभ्यासक आहेत. मी त्यांना हे काय आहे, असं विचारलं. ते शांत बसले आणि म्हणाले की, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर ते (मराठे) सात होते की आठ होते की दहा होते, हे कोठेही लिहिलेलं नाही. प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते याचा जगाच्या इतिहासात काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सर्व काल्पनिक नावं आहेत.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज ठाकरे यासंबंधी पवारसाहेबांशीही बोलले. तेव्हा शरद पवार यांनी गजानन मेहंदळे यांनी दिलेली माहिती खरी असल्याचे मान्य केले आहे,
अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावामध्ये प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांचे युद्ध झाले होते.
या नेसरीतील ग्रामस्थांनी सिनेमात दाखवण्यात येणारी सात मराठ्यांची नावं चुकीची असल्याचा आरोप केला आहे,
तर संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी
या चित्रपटात झालेली इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नाही, असे सांगितले होते.

 

Web Title :- Raj Thackeray | raj thackeray comment on vedant marathe veer daudale saat move in kudal

 

हे देखील वाचा :

Ravish Kumar | हा माझा नवीन पत्ता, राजीनाम्यानंतर रवीश कुमारांनी केले ट्वीट

Nora Fatehi | अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा; सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव

RSS Nagpur Headquarter | नागपूरमधील संघाचे मुख्यालय उडवून देण्याचे धमकी पत्र पाठवणारा अटकेत

 

Related Posts