IMPIMP

RSS Nagpur Headquarter | नागपूरमधील संघाचे मुख्यालय उडवून देण्याचे धमकी पत्र पाठवणारा अटकेत

by nagesh
Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   अनेक दिवसांपासून पोलिसांना वारंवार धमकीची पत्रे मिळत आहेत. आता नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय (RSS Nagpur Headquarter) उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे पोलिसांना देण्यात आली होती. एका निनावी पत्राद्वारे ही धमकी (RSS Nagpur Headquarter) देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाचे रेशीमबाग येथील कार्यालय (RSS Nagpur Headquarter) उडवून देण्याची धमकी एका निनावी पत्रात आली होती. हे निनावी पत्र 25 नोव्हेंबर 2022 रोजी सक्करदरा पोलीस ठाणे येथे आले होते. पोलिसांनी या पत्राबद्दल तपास केला असून, याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. महापारेषणचा अभियंता असलेल्या या तरुणाने हे पत्र दिल्याचे उघड झाले आहे. ज्याने हे पत्र पाठवले, त्या तरुणाने आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यापूर्वीदेखील मुंबई वाहतूक पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या होणार असल्याची धमकी पाठविण्यात आली होती.
पोलिसांना अनेक ऑडिओ क्लिप्स संशयित आरोपीने पाठवल्या होत्या.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याची टोळी हा कट रचत असल्याचे यात म्हटले होते.
त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले होते.
पण, पोलीस तपासात या ऑडिओ क्लिप्स फसव्या आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
संदेश पाठवणाऱ्या संशयिताचे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.

 

Web Title :- RSS Nagpur Headquarter | threatening letter to blow up rss headquarters with explosives in nagpur

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात नारायण राणे यांची आज सुनावणी

Pune Pimpri Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला…’, तळेगावमध्ये तरुणीचा भररस्त्यात विनयभंग

Related Posts