IMPIMP

Ravish Kumar | हा माझा नवीन पत्ता, राजीनाम्यानंतर रवीश कुमारांनी केले ट्वीट

by nagesh
Ravish Kumar | Ravish Kumar Twit for india's peoples

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे मोठे पत्रकार आणि वृत्त निवेदक रवीश कुमार (Ravish Kumar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अदानी समूहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर बुधवारी एनडीटीव्हीचे संस्थापक – प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला होता. आता रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही राजीनामा दिला आहे. रवीश कुमारांनी राजीनामा दिल्यावर एक ट्वीट करत आपल्या चाहत्यांना संदेश दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

माननीय लोकहो,

माझ्या असण्यास तुमचादेखील सहभाग आहे. तुमचे प्रेम हीच माझी दौलत आहे. मी तुमझ्यासोबत एकतर्फी आणि मोठा संवाद यापूर्वी साधला आहे. माझा यूट्यूब चॅनल हा माझा आता नवीन पत्ता आहे. सर्वांना मोदी मीडियाच्या गुलामीविरोधात लढायचे आहे.

तुमचा,
रवीश कुमार

 

असे ट्वीट रवीश कुमार यांनी केले आहे. कुमार गेली 26 वर्षे एनडीटीव्ही वाहिनीसोबत काम करत होते. 1996 साली पहिल्यांदा त्यांचा एनडीटीव्हीशी संपर्क आला. तेव्हापासून त्यांनी आपली पत्रकारिता आणि वृत्तांकनाच्या माध्यमातून समाजाचा आणि चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळवला. सामान्यांचे प्रश्न मांडण्याची त्यांची हातोटी विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय आहे. ‘रवीश की रिपोर्ट’ आणि ‘प्राईम टाईम’ कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडली. त्यामुळे त्यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ravish Kumar | Ravish Kumar Twit for india’s peoples

 

हे देखील वाचा :

Nora Fatehi | अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा; सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव

Pune Crime | पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळला ‘त्या’ प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

RSS Nagpur Headquarter | नागपूरमधील संघाचे मुख्यालय उडवून देण्याचे धमकी पत्र पाठवणारा अटकेत

Pune Pimpri Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू मला…’, तळेगावमध्ये तरुणीचा भररस्त्यात विनयभंग

 

Related Posts