IMPIMP

Rajgad Trekker Accident | राजगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 33 वर्षीय पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

by sachinsitapure
Rajgad Trekker Accident | tourist who went to rajgad for tourism died after falling into the water tank accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Rajgad Trekker Accident | सलग सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटकांचे पाय पर्यटन स्थळांकडे (Tourist Spot) वळले आहेत. पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी आणि ट्रेकिंगसाठी अनेक स्थळे असून या ठिकाणी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, मंगळवारी पहाटे पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर (Rajgad Fort) दुर्दैवी घटना (Rajgad Trekker Accident) घडल्याचे समोर आले आहे. फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा राजगड किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू (Tourist Death) झाला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अजय मोहनन कल्लामपारा Ajay Mohanan Kallampara (वय-33 रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लि. कंपनीत (Tata Consumer Products Ltd.) काम करीत होता.

ठाणे येथील चार पर्यटक रात्री राजगडावर गेले होते. रात्रीच्या सुमारास अजय जवळच असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्यासोबत आलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. सकाळी तो पाण्याच्या टाकीत आढळून आला. (Rajgad Trekker Accident)

हरिश्चंद्र गडावर पुण्यातील ट्रेकरचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी हरिश्चंद्र गडावर (Harishchandra Fort) पुण्यातील ट्रेकरचा मृत्यू झाला होता.
पुणे परिसरातून हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या सहा जणांच्या ग्रुपमधील एका ट्रेकरचा खराब हवामानामुळे मृत्यू
झाला होता. अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते Anil alias Balu Natharao Geete (वय-32 रा. लोहगाव) असे त्याचे नाव
होते. गडावरील दाट धुके, कोसळणारा पाऊस व बोचऱ्या थंडीमुळे आजारी पडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title : Rajgad Trekker Accident | tourist who went to rajgad for tourism died after falling
into the water tank accident

Related Posts