IMPIMP

Rakesh Jhunjhunwala चा ‘हा’ स्टॉक पोहचला ऑल-टाइम हाय ! पुढे काय आहे शक्यता? जाणून घ्या

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala stock titan at new all time high on strong demand in q3

नवी दिल्ली :वृत्तसंस्था Rakesh Jhunjhunwala | बिग बुल राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) यांच्या आवडत्या स्टॉकने शुक्रवारी त्याचा जुना विक्रम मोडला आणि नवीन उच्चांक गाठला. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश असलेल्या टायटनचा शेअर आज 3.5 टक्क्यांनी वाढला आणि बीएसईवर 2687.30 रुपयांच्या विक्रमी किमतीवर पोहोचला. यापूर्वी, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2021 मध्ये, टायटनचा शेअर 2678.10 च्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. (Rakesh Jhunjhunwala)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मजबूत मागणीमुळे डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 36 टक्के अधिक महसूल मिळाला. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी आली. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4.33 कोटी शेअर्स आहेत जे 4.9 टक्के शेअर्सच्या समतुल्य आहेत.

 

डिसेंबर तिमाहीत वाढला व्यवसाय

टाटा समूहाच्या दागिन्यांचा व्यवसाय असलेल्या टायटन कंपनीचा व्यवसाय डिसेंबर 2021 च्या तिमाहीत वार्षिक आधारावर 37 टक्के वाढला. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या म्हणण्यानुसार, यामध्ये सराफा विक्रीच्या आकड्यांचा समावेश नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सणांमुळे दागिन्यांची मागणी वाढली. त्यामुळे कंपनीला फायदा झाला आणि व्यवसाय वाढला. (Rakesh Jhunjhunwala)

 

टायटन घड्याळे आणि वेअरेबल श्रेणीतील व्यवसाय देखील 28 टक्क्यांनी वाढला आहे. सनग्लासेस आणि फ्रेम्सना चांगली मागणी असल्याने चष्मा व्यवसायात 27 टक्के वाढ झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हा आहे तज्ञांचा गुंतवणूक सल्ला

टायटनच्या किमतीत गेल्या एका महिन्यात 10 टक्के, सहा महिन्यांत 51.6 टक्के आणि गेल्या वर्षभरात 70 टक्के वाढ झाली आहे. Tips2Trades चे सह-संस्थापक पवित्र शेट्टी यांच्या मते, तांत्रिकदृष्ट्या टायटनचे शेअर्स रु. 2777 च्या वर बंद होत नाहीत तोपर्यंत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधील काही शेअर्स विकून नफा कमवावा.

 

शेट्टी यांच्या मते, जर ते याच्या वर बंद झाले तर त्याची किंमत 2782 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. सपोर्ट लेव्हल बद्दल बोलायचे झाले तर त्याला रु. 2752 च्या पातळीवर तात्काळ मजबूत सपोर्ट मिळत आहे.

 

मिलन वैष्णव (CMT, MSTA), सल्लागार तांत्रिक विश्लेषक आणि संस्थापक, Gemstone Equity Research & Advisory Services (CMT, MSTA) यांनी गुंतवणूकदारांना रु. 2500 च्या स्टॉप लॉससह त्यांची स्थिती कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. वैष्णव यांच्या मते, पुढे सुद्धा तेजी दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala stock titan at new all time high on strong demand in q3

 

हे देखील वाचा :

Pune Corona | चिंताजनक! पुण्यातील ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात तब्बल 2757 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Gold Price Today | आज पुन्हा घसरले सोने; चांदीही उतरली, कुणीही विचार केला नसेल इतक्या घसरणीचा, जाणून घ्या आजचा दर

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल

 

Related Posts