IMPIMP

Rakesh Jhunjhunwala’s Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील ‘हे’ स्टॉक्स करतील मालामाल; शेअर 400 टक्क्यांपर्यंत वाढला, जाणून घ्या

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala owned shares fall after his death aptech star health major losers

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rakesh Jhunjhunwala’s Portfolio | अनेक गुंतवणूकदार (Investors) कमी गुंतवणूक आणि अधिक परतावा मिळण्यासाठी चांगल्या शेअर्सकडे लक्ष केंद्रीत करत असतात (Rakesh Jhunjhunwala). चांगला परतावा मिळावा यासाठी अनेक गुंतवणूकदारांच्या नजरा संबधित स्टॉक्सकडे लागल्या असतात. दरम्यान, स्टॉक मार्केट (Stock Market) मधील नाव असलेले दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala’s Portfolio) यांचे देखील जवळपास स्टाॅक तेजीत आहेत. (Share Market Marathi News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे पाच स्टॉक आहेत, जे त्यांना 2022 मध्ये भरपूर कमाई करुन देत आहेत. यापैकी एका शेअरने 2022 मध्ये झुनझुनवालाला 110 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये राकेश झुनझुनवाला यांचे शेअर्स आहेत तर आता त्यांच्या पाच स्टॉक्सबाबत जाणून घेऊयात. (Rakesh Jhunjhunwala’s Portfolio)

 

1. इंडियन हॉटेल्स कंपनी (Indian Hotel Company) –
Tata Group च्या इंडियन हॉटेल्सचे शेअर्स 2022 मध्ये आतापर्यंत 36 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना वरील निर्बंध हटवल्यानंतर पर्यटनात आलेल्या तेजीचा लाभ हॉटेल्सना मिळतोय. डिसेंबर 2021 तिमाहीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे इंडियन हॉटेल्समध्ये 1.42 कोटी शेअर्स अथवा 1.08 टक्के हिस्सा आहे आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwalas) यांच्याकडे देखील 1.08 टक्के हिस्सा आहे.

 

2. डीबी रिअ‍ॅल्टी (DB Realty) –
या शेअरनी 2022 मध्ये आतापर्यंत 110 टक्क्यांनी उसळी घेतलीय. बुधवारीही या शेअरमध्ये वाढ झाली आहे. एका वर्षात या शेअरने 405 टक्के परतावा दिला आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे DB रियल्टीमध्ये 1 कोटी शेअर्स आहेत आणि डिसेंबर 2021 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार त्यांचा हिस्सा 4.12 टक्के आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. मेट्रो ब्रँड (Metro Brands) –
ही गेल्या दशकात सर्वात वेगाने वाढणारी फुटवेअर रिटेल कंपन्यांपैकी एक आहे. या वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये आतापर्यंत 32.46 टक्क्यांनी वाढ झालीय. एका वर्षात स्टॉकमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झालीय. डिसेंबर 2021 तिमाहीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला मेट्रो ब्रँड्समध्ये 9.62 टक्के आणि त्यांच्या रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 4.81 टक्के हिस्सा आहे.

 

4. क्रिसिल (Crisil) –
क्रिसिलच्या शेअर्समध्ये यंदा आतापर्यंत 15.77 टक्के वाढ झालीय. आर्थिक उलाढाल वाढल्याने, नवीन प्रोडक्ट आणि सोल्युशन ऑफरमुळे कंपनीचा व्यवसाय तेजीत आहे.
त्याचाही शेअरवर परिणाम झाला आहे.
डिसेंबर तिमाहीच्या आकडेवारीनुसार, राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे क्रिसिल मध्ये 40 लाख शेअर्ससह 5.49 टक्के स्टाॅक आहेत.

 

5. नाल्को (Nalco) –
नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी (NALCO) च्या शेअरच्या किमतीत 2022 मध्ये 16 टक्के वाढ झाली आहे.
एका वर्षात त्याने गुंतवणूकदारांना 106 टक्के परतावा दिला आहे.
डिसेंबर 2021 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये नाल्कोचे 5 कोटी शेअर्स अर्थात 2.72 टक्के हिस्सा आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala’s Portfolio | rakesh jhunjhunwalas portfolio these five stock gave more return this year check details

 

हे देखील वाचा :

Gold Price Today-MCX Market India | सोन्याचा भाव 53 हजारच्या जवळ; पाहा कसं महागलं सोनं

Bitcoin Fraud Case Pune | बिटकॉईन प्रकरणात मनी लाँड्रिंग ?, ED घेऊ शकते रविंद्रनाथ पाटील आणि पंकज घोडेचा ‘ताबा’

Chandrakant Patil On Kolhapur North By Election Result | कोल्हापूरच्या पोटनिवडणूकीत भाजपचा पराभव ! ‘आता तुम्ही हिमालयात निघून जाणार का ?’, चंद्रकांत पाटील म्हणाले…

 

Related Posts