IMPIMP

Rakhi Sawant | राखी सावंतने केला मोठा खुलासा; म्हणाली “मी आदिलसाठी धर्मांतर केल्याचे कळताच आईने…”

by nagesh
Rakhi Sawant | rakhi sawant mother reaction after she converted into islam to marry adil khan

सरकारसत्ता ऑनलाईन  – बॉलिवूड अभिनेत्री-ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सतत प्रेक्षकांसाठी काही ना काही मनोरंजक गोष्टी करत
असते. सध्या राखी आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. राखी सावंतने आपला पती आदिल खानवर गंभीर आरोप करत पोलिसांत
तक्रार केली आहे. तसेच पोलिसांनी आदिल खान दुर्रानीला अटकसुद्धा केली आहे. राखीच्या आयुष्यात बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यापासून
विविध गोष्टी घडत आहे. आधी राखीच्या (Rakhi Sawant) आईला ब्रेन ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर राखीची आई अनेक दिवस
रुग्णालयात उपचार घेत होती. दरम्यान राखी सावंतच्या लग्नाचं सत्य समोर आलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राखी सावंतने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपलं लग्न झालं असून या लग्नासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. तसेच तिने स्वतःचं नावही फातिमा ठेवलं असल्याचं सत्य सांगितलं होत .त्यानंतर काहीच दिवसात आदिल मला स्वीकारत नसून आपल्याला फसवल्याचा आरोप राखीने केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आदिलने स्वतः आपलं लग्न झाल्याचं सांगत राखीला आपली पत्नी मानल्यानंतर सर्वकाही सुरळीत झालं होतं. मात्र राखीच्या आईच्या निधनानंतर पुन्हा एकदा राखी आणि आदिलमध्ये वाद निर्माण झाला आहे. आदिलने आपल्याला मारहाण केल्याचं सांगत राखीने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांनतर मुंबई पोलिसांनी आदिल खान दुर्रानीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

 

 

राखीने धर्म बदलल्याचं तिच्या आईला कळाल्यावर आईच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना राखी म्हणाली कि
“माझ्या आईला जेव्हा मी आदिलशी लग्न केलंय आणि त्यासाठी मी धर्म बदलला हे कळालं तेव्हा ती खूप रडली होती.
ती मला म्हणाली की तू धर्म का बदललास?, याच्याशी का लग्न केलंस? पण आम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे
असं सांगितल्यावर आई म्हणाली होती की तू आयुष्यात खूप दुःख सोसलंय, त्यामुळे आता खुश राहा.
आणि त्यावेळी आदिल माझ्या आईच्या पायादेखील पडला होता. तिने आदिललाही मला त्रास न देण्याबदद्ल सांगितलं होतं,”. “आदिलने मला मारल्यानंतर एकदा मी आईच्या भेटीला गेले ,तेव्हा आईने हे सगळं काय आहे, अशी विचारणा केली होती. मी आदिलने मारल्याचं सांगितल्यावर माझी आई खूप रडली होती. मला वडील असते तर कदाचित आदिलने ही हिंमत केली नसती. जरी माझ्याजवळ आई-वडील दोघेही नसले तरी देव आहे,” हे सर्व सांगताना राखी सावंत खूप रडत होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant mother reaction after she converted into islam to marry adil khan

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस्, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

Sangli ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना महिला व्यवसाय कर अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Kasba Chinchwad Bypoll Election | संभाजी ब्रिगेडच्या निर्णयामुळे मविआचा मार्ग सुकर?, शिवसेनेच्या मध्यस्थीला आलं यश; भाजपचं टेन्शन वाढणार?

 

Related Posts