IMPIMP

Ranveer Singh | टेन्शन नाही घ्यायचं, उपदेश नाही द्यायचा…’ टाटाच्या बॉसने दिला रणवीर सिंहला सल्ला

by nagesh
Ranveer Singh | tension nahi lene ka gyan nahi dene ka tata boss advice to ranveer singh

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन  Ranveer Singh | सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) न्यूड फोटोशूट केल्याने चर्चेत आहे. याप्रकरणी त्याच्यावर मुंबईत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा आरोप आहे. दरम्यान, टाटा समूहाचे (Tata Group) चेअरमन नटराजन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांनी रणवीर सिंहला आयुष्याचा मोठा धडा शिकवला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Awards सोहळ्यात समोरासमोर
निमित्त होते सोमवारी मुंबईत आयोजित IAA Leadership Awards 2022, ज्यामध्ये मार्केटिंग, जाहिरात आणि मीडिया क्षेत्रातील दिग्गजांना सन्मानित करण्यात आले. समारंभात Question-Answer Session ही घेण्यात आले. यावेळी अभिनेता रणवीर सिंह आणि टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन समोरासमोर आले. (Ranveer Singh)

 

रणवीरने Tata Boss कडून घेतला सल्ला
या सत्रात रणवीर सिंहने टाटाच्या बॉसला अनेक प्रश्न विचारले. दरम्यान, अभिनेत्याने कबूल केले की त्याला वेळ व्यवस्थापनासाठी सल्ल्याची नितांत गरज आहे. असे म्हणत तो चंद्रशेखरन यांच्याकडे वळला. या प्रश्नावर टाटा सन्सच्या अध्यक्षांनी त्यांला जीवनाचा मोठा धडा दिला. चंद्रशेखरन यांचा सल्ला सोपा होता. त्यांनी रणवीर सिंहला सांगितले की ’टेन्शन घेऊ नको, ज्ञान देऊ नको’ (do not take needless stress, and do not preach).

टाटाच्या अध्यक्षांच्या बोलण्यावर टाळ्यांचा कडकडाट
बॉलीवूड अभिनेत्याला हा सल्ला देत एन चंद्रशेखरन यांनीही रणवीर सिंहच्या उर्जेबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की तू दाखवलेल्या उर्जेच्या 10 टक्केही जर मला मिळाली तर माझे आयुष्य खूप वेगळे असेल. ते पुढे म्हणाले की, तू हे कसे करतो ते मला माहीत नाही. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.

 

चंद्रशेखरन यांना बिझनेस लीडर अवॉर्ड
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना समारंभात बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर अभिनेता रणवीर सिंहला ब्रँड एंडोर्सर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान एका फायरसाईड चॅटमध्ये, चंद्रशेखरन यांनी टाटा समूहातील नेतृत्वापासून ते रतन टाटा यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींपर्यंतचे त्यांचे अनुभव देखील शेअर केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ranveer Singh | tension nahi lene ka gyan nahi dene ka tata boss advice to ranveer singh

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

ITR भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी, ट्रेंड करत आहे Extend Due Date Immediately

Pune Crime | माथाडी संघटनेचा अध्यक्ष ओंकार हिंगेला खंडणी घेताना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

 

Related Posts