IMPIMP

ITR भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी, ट्रेंड करत आहे Extend Due Date Immediately

by nagesh
ITR | itr filing last date closer and extend due date immediately trending on twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी आता फक्त 6 दिवस उरले आहेत. यासाठी सरकारने 31 जुलै 2022 ही अंतिम तारीख (Last Date) निश्चित केली आहे. जसजशी शेवटची तारीख जवळ येत आहे, तसतशी ती वाढवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यावेळी ’Extend Due Date Immediately’ ट्विटर (Twitter) वर जोरदार ट्रेंड होत आहे. (ITR)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील वर्षीही चालवली होती मोहीम
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख (ITR Last Date) वाढवण्याची (Extend) मागणी करत टॅक्सपेयर ट्विटरवर त्यांना होणारा त्रास मांडत आहेत. काहीजण प्राप्तीकर विभागाच्या पोर्टलमधील समस्यांचे कारण देत आहेत, तर काही इतर कारणांसाठी शेवटची तारीख वाढवण्याची विनंती करत आहेत. मागील वर्षी देखील करदात्यांनी पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींबाबत ट्विटरवर अशाच प्रकारे मोहीम सुरू केली होती.

 

 

पोर्टलमध्ये समस्या येत असल्याची तक्रार
सध्या ट्विटरवर ट्रेंड होत असलेल्या या मागणीबद्दल बोलायचे तर काही लोकांनी आयटीआर पोर्टल (ITR Portal) चा स्क्रीनशॉट घेऊन तो शेअर केला आहे आणि पोर्टल पुन्हा डाउन झाल्याचे लिहिले आहे. तर कुणी लिहिले की, विभागाला समस्या सांगितल्यावर, स्वता प्राप्तीकर अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाच अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षीची शेवटची तारीख वाढवल्याचे उदाहरणही करदाते देताना दिसत आहेत. (ITR)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

31 जुलैनंतर आकारला जाईल दंड
प्राप्तीकर विभाग करदात्यांना त्यांचा आयटीआर भरण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे विभागाकडून सांगण्यात येत आहे. वास्तविक, 31 जुलैच्या देय तारखेनंतर आयटीआर दाखल केल्यास, करदात्याला दंड (Fine) भरावा लागेल. या अंतर्गत तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर दंडाची रक्कम 5,000 रुपये असेल. तर 5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना 1000 रुपये दंड भरावा लागेल.

 

तारीख वाढवण्यास विभागाचा नकार
प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) यापूर्वीच स्पष्ट केले आहे की यावेळी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवली जाणार नाही. सोमवारी बिझनेस टुडेशी झालेल्या संभाषणात अधिकार्‍यांनी सांगितले की, रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी विभागाच्या आयटीआर पोर्टलवरील अनियमितता तपासण्यासाठी नियमित आढावा घेतला जात आहे. ते म्हणाले की, आयटीआर भरण्याची अंतिम मुदत यावर्षी वाढवता येणार नाही.

 

तीन कोटींहून जास्त रिटर्न दाखल
बिझनेस टुडेच्या रिपोर्टमध्ये, प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, आतापर्यंत 3 कोटींहून जास्त करदात्यांनी (Taxpayers) आयटीआर भरला आहे.
त्याच वेळी, वीकेंडमध्ये 40 लाख आयटी रिटर्न भरले गेले.
ही आकडेवारी पाहता विभागाच्या आवाहनाचा परिणाम करदात्यांच्या मनावर होत असल्याचे म्हणता येईल.
प्राप्तीकर विभागाने करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- ITR | itr filing last date closer and extend due date immediately trending on twitter

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray Birthday | सत्ताधार्‍यांना जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं ! उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना म्हणाले…

Blood Group | ‘या’ ब्लड ग्रुपचे लोक असतात सर्वात जास्त बुद्धीमान, चांगली असते विचार करण्याची; समजण्याची शक्ती

Pune Crime | माथाडी संघटनेचा अध्यक्ष ओंकार हिंगेला खंडणी घेताना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

 

Related Posts