IMPIMP

Pune Crime | माथाडी संघटनेचा अध्यक्ष ओंकार हिंगेला खंडणी घेताना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

by nagesh
Aurangabad Crime | 15 lakh robbery in pagariya auto inter state robs gang arrested aurangabad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन 30 हजार रुपये खंडणी (Extortion) स्विकारणाऱ्या पुण्यातील स्वराज शिलेदार माथाडी संघटनेचा (Swaraj Shiledar Mathadi Sangathan President) अध्यक्ष ओंकार रमेश हिंगे Omkar Ramesh Hinge (रा. बिबवेवाडी) याला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) रंगेहात पकडले. आरोपी हिंगे याने फिर्यादी यांना ‘तुला माझ्या एरियामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टचे काम करायचे असेल तर मला महिन्याला 40 हजार रुपये द्यावे लागतील’ अशी धमकी (Pune Crime) दिली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत धायरीगाव येथे राहणाऱ्या व्यक्तीने खंडणी विरोधी पथक दोन कडे तक्रार अर्ज केला होता. पथकाने बिबवेवाडी येथील इनामदार चौकातील कॅफे काई (Cafe Kai) येथे सापळा रचून फिर्यादी यांच्याकडून 30 हजार रुपये खंडणी स्विकारताना ओंकार हिंगे याला बेड्या (Arrest) ठोकल्या. (Pune Crime)

 

आरोपी हिंगे याने फिर्यादी यांना फोन करुन ‘तुला माझ्या एरियामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टचे (Labor Contract) काम करायचे असेल तर मला महिन्याला 40 हजार रुपये द्यावे लागतील’ अशी धमकी दिली होती. तसेच हिंगे याने फिर्यादी यांना मोबाईलवर संपर्क करुन त्यांच्या गाड्या अडवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तडजोडी अंती 30 हजार रुपयांची मागणी करुन फिर्यादीकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. आरोपीविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) आयपीसी 386, 387 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajagane),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav)
पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सैदाबा भोजराव, चेतन शिरोळकर, चेतन आपटे, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, पवन भोसले, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : – Pune Crime | Omkar Hinge president of the Mathadi organization was handcuffed by the pune police crime branch while taking extortion

 

हे देखील वाचा :

Blood Group | ‘या’ ब्लड ग्रुपचे लोक असतात सर्वात जास्त बुद्धीमान, चांगली असते विचार करण्याची; समजण्याची शक्ती

Pune Crime | 7 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या तोलगेकर ज्वेलर्सच्या मालकावर गुन्हे शाखेकडून FIR

Gold-Silver Prices | चांदी झाली 4000 रुपये स्वस्त, सोने सुद्धा जुलैमध्ये खुपच कमी दरात

 

Related Posts