IMPIMP

Regular Income Plan | ‘इन्कम’ चा जबरदस्त फॉर्म्युला – SWP मध्ये गुंतवणुकीतून दर महिना होईल कमाई, जाणून घ्या आणखी फायदे

by nagesh
Regular Income Plan | regular income plan mutual funds investment systematic withdrawal plan check benefits and how it works

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRegular Income Plan | तुम्ही केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळाले तर कसे
होईल ? होय, म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) तुमच्या गुंतवणुकीतून तुम्ही नियमित उत्पन्न देखील मिळवू शकता. यासाठी तुम्हाला सिस्टिमॅटिक
विथड्रॉल प्लॅन Systematic Withdrawal Plan (SWP) मध्ये गुंतवणूक करावी लागेल. (Regular Income Plan)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पण, हे SWP काय आहे ? हे तुम्हाला नियमित उत्पन्न कसे देईल ? आणि SWP करणे केव्हा फायदेशीर आहे ? ही SWP पेक्षा चांगली योजना आहे का ?
अशाच काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

 

काय आहे सिस्टमॅटीक विथड्रॉल प्लान (SWP) ?

सिस्टमॅटीक विथड्रॉल प्लान (SWP) ही एक प्रकारची सुविधा आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनांमधून (Mutual Fund Schemes)
निश्चित रक्कम परत मिळते. किती वेळेत किती पैसे काढायचे याचा पर्याय गुंतवणूकदार स्वत: निवडतात. ते हे काम मासिक किंवा त्रैमासिक आधारावर
करू शकतात.

मात्र, मासिक पर्याय (नियमित मासिक उत्पन्न) अधिक लोकप्रिय आहे. गुंतवणुकदाराला केवळ ठराविक रक्कम काढायची असल्यास किंवा त्याला हवे
असल्यास, तो गुंतवणुकीवर मिळणारे कॅपिटल गेन्स (Capital Gains) काढू शकतो. (Regular Income Plan)

 

कसे सुरू करू शकता SWP ?

SWP कधीही सुरू करता येते. पहिली गुंतवणूक करताच ते सुरू करता येते.
कोणत्याही योजनेत गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही त्यात SWP पर्याय सक्रिय करू शकता.
नियमित कॅश फ्लोच्या आवश्यकतेसाठी ते कधीही सुरू करता येते.

SWP सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला एएमसीमध्ये फोलिओ क्रमांक, विथड्रॉल फ्रिक्वेन्सी, पैसे काढण्याची प्रथम तारीख, पैसे प्राप्त करणार्‍या बँक खात्याला नमूद करत एएमसीमध्ये इन्स्ट्रक्शन स्लिप भरावी लागेल.

 

SWP निधी म्हणजे काय ?

सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान प्रमाणे आहे SWP.

SWP : Systematic Withdrawal Plan.

सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान गुंतवणूकदारांसाठी ’रामबाण उपाय’ आहे.

तुम्ही तुमचे पैसे नियमित कालावधीत काढू शकता.

यामुळे, कॅश फ्लो गुंतवणूकदाराकडे राहतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

SWP द्वारे नियमित मिळेल उत्पन्न

SWP सह, तुम्ही नियमित अंतराने पैसे काढू शकता.

मासिक, त्रैमासिक, वार्षिक आधारावर पैसे काढा.

NAV वर आधारित खात्यातून दरमहा पैसे काढण्याचा पर्याय.

तुम्ही हे पैसे MF मध्ये गुंतवू शकता किंवा खर्च करू शकता.

SWP विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन केलेले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक फायदा होतो.

ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नावर कमी कर भरावा लागतो.

 

ही माहिती SWP साठी आवश्यक आहे का ?

तुम्हाला SWP कोणत्या फंडातून चालवायचा आहे ?

तुम्हाला किती SWP पाहिजे आहे ?

तुम्हाला SWP किती काळ चालवायचे आहे ?

महिन्याची तारीख नमूद करणे आवश्यक आहे.

 

SWP सुरू करण्यापूर्वी काय जाणून घ्यावे ?

जर तुमची गुंतवणूक डेट फंडात आहे.

तुम्हाला 8% रिटर्न मिळत आहे.

वार्षिक 10% पैसे काढत आहात.

अशा प्रकारे तुम्ही भांडवल खर्च करत आहात.

– गुंतवलेले भांडवल कमी होऊ शकते.

5 वर्षात किती रक्कम आवश्यक.

तेवढी रक्कम डेटमध्ये गुंतवा.

अतिरिक्त रक्कम हायब्रीड फंडात टाका.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

SWP कसे कार्य करते ?

तुम्ही तुमच्या SWP ची रक्कम/तारीख/कालावधी नमूद करणे आवश्यक आहे.

दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे जातील.

हे पैसे तुमच्या फंडातून युनिट्स विकून उपलब्ध होतात.

फंडातील पैसे संपल्यास, SWP बंद होईल.

 

SWP आणि SIP मधील फरक ?

SIP मध्ये दर महिन्याला तुमच्या खात्यातून निश्चित रक्कम कापली जाते.

खात्यातून कापलेली रक्कम म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी जाते.

SWP मध्ये नमूद केलेली रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते.

SWP ची रक्कम म्युच्युअल फंड युनिट्सच्या विक्रीतून येते.

 

ही खबरदारी SWP मध्ये आवश्यक आहे

SWP कधीही इक्विटी म्युच्युअल फंडामधून चालवू नका.

बाजार घसरल्यावर तुमच्या फंडावर परिणाम होतो.

ठरवलेली रक्कमेसाठी जास्त युनिट्स विकावे लागतील.

असे केल्याने पोर्टफोलिओ लवकर संपेल.

SWP साठी डेट/लिक्विड फंड हा एक चांगला पर्याय.

 

SWP चे फायदे

आवश्यकतेनुसार गुंतवणूकदार रक्कम निवडू शकता.

बाजारात गुंतवणूक करून चांगल्या रिटर्नची अपेक्षा.

महागाईवर मात करण्यासाठी चांगला पर्याय.

बाजारातील अस्थिरता सहन करू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

SWP मधील गुंतवणुकीवर किती कर ?

इक्विटीवर 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत STCG लावला जातो.

डेटमध्ये 3 वर्षांपेक्षा कमीवर STCG.

इक्विटीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त नफा असल्यास कर.

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या पूर्ततेवर कर आकारला जाईल.

 

काय लक्षात ठेवावे ?

SWP करताना, तुम्हाला कर दायित्वाची काळजी घ्यावी लागेल.

प्रत्येक पैसे काढण्याला रिडम्पशन मानले जाते.

यामुळे यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल.

कॅपिटल गेन निर्धारित कर स्लॅबनुसार लागतो.

 

Web Title :- Regular Income Plan | regular income plan mutual funds investment systematic withdrawal plan check benefits and how it works

 

हे देखील वाचा :

Retinal Age Gap | डोळ्यांच्या रेटिनाद्वारे समजू शकते किती आयुष्य आहे तुमचे – स्टडी

Wrinkle Removing Tips | झोपताना चेहर्‍यावर लावा ‘हे’ तेल, सुरकुत्यांपासून होईल सुटका; जाणून घ्या पध्दत

Siddhanth Shakti Kapoor Detained | रेव्ह पार्टीत सापडला शक्ती कपूरचा मुलगा; सिद्धांत कपूरसह 6 जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे आले समोर

 

Related Posts