IMPIMP

Siddhanth Shakti Kapoor Detained | रेव्ह पार्टीत सापडला शक्ती कपूरचा मुलगा; सिद्धांत कपूरसह 6 जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे आले समोर

by nagesh
Siddhanth Shakti Kapoor Detained | actor shraddha kapoors brother and shakti kapoors son siddhanth kapoor detained during police raid at a rave party in bangalore mg road hotel

सरकारसत्ता ऑनलाइन – Siddhanth Shakti Kapoor Detained | ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) बॉलीवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh
Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्लीन चिट मिळाली आहे. हे प्रकरण अद्यापही सुरूच असताना आता आणखी एका
अभिनेत्याच्या मुलाला रेव्ह पार्टीत (Rave Party) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूत एका हॉटेलमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती (Rave Party In Bangalore Hotels) . त्यावेळी, पोलिसांनी ही कारवाई केली. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेता शक्ती कपूरचा (Shakti Kapoor) मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

एएनआयनुसार बंगळुरूच्या एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सिद्धांत कपूर तेथे आढळून आला (Siddhanth Shakti Kapoor Detained). त्याला ताब्यात घेतल्यानंतर चाचणीमध्ये सिद्धांत कपूरसह सहा जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले आहे.

 

 

ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा सिद्धांत हा मुलगा असून तो स्वत:ही फिल्म लाईनमध्ये आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
पण त्याची कारकीर्द फ्लॉप ठरली आहे. याशिवाय वेब सिरीज, म्युझिक व्हिडीओमध्येही दिसला आहे.
हसीना पारकर या चित्रपटात सिद्धांतने श्रद्धासोबत काम केले होते. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात NCB च्या रडारवर आलेली श्रद्धा कपूरचीही एनसीबीच्या पथकाने चौकशी केली होती.

 

 

Web Title :- Siddhanth Shakti Kapoor Detained | actor shraddha kapoors brother and shakti kapoors son siddhanth kapoor detained during police raid at a rave party in bangalore mg road hotel

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार ! अश्लील फोटो, व्हिडीओ काढले

Sidhu Moose Wala Murder Case | सिद्धु मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील संशयित शॉर्प शूटर संतोष जाधवला साथीदारासह गुजरातमधून अटक

Bacchu Kadu | शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालतं? बच्चू कडू म्हणाले…

 

Related Posts