IMPIMP

रिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिले, NCB च्या चार्जशीटमध्ये आरोप; रियाच्या अडचणीत वाढ

by bali123
sushant singh rajput

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत ( sushant singh rajput ) मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीने (नार्कोटिक्स ब्यूरो) विशेष न्यायालयात तब्बल 12 हजार पानांचे पहिले चार्जशीट दाखल केले आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीच्या नावाचा समावेश आहे. एनसीबीच्या चार्जशीटमध्ये एकूण 32 व्यक्तींच्या विरोधात अवैध तस्करीचा आरोप लावण्यात आला आहे. NDPS अधिनियमाच्या कलम 27 अ प्रमाणे आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये आरोपींना 10 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षांच्या कैदेची तरतूद आहे.

दरम्यान, रियाने यापूर्वीच स्वत:च घरात ड्रग्ज आणत असल्याचे कबूल केलं आहे. नोव्हेंबर 2019 पासून याची सुरुवात झाली होती. याशिवाय ड्रग्जसाठी रियाने तिचा भाऊ शौविकला अगोदरच पैसे ट्रान्सफर केले होते. त्यामुळे आता एनसीबीने रियावर ड्रग्ज खरेदी करणे आणि ते सुशांतला पुरवण्याचे आरोप लावले आहेत. यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एनसीबीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये असे नमूद केले आहे की, सुशांतला मारिजुआन आणि गांजा दिला जात होता. रियाशिवाय तिचा भाऊ शौविक, सुशांतच्या घरातील मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि ऋषिकेश पवार नावाचा अन्य एक आरोपी ड्रग्ज खरेदी करून ते सुशांतला पुरवत असल्याचे चार्जशीटमध्ये नमूद केलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एनसीबीने 11 हजार 700 पानांचे चार्जशीट न्यायालयात सादर केले आहे.
एनसीबीने न्यायालयात चार्जशीट दाखल केली असून,
त्यानुसार रियाला 10 किंवा 20 वर्षांची कैद होऊ शकते.
एनसीबीने चार्जशीट न्यायालयात दाखल केल्याने रियाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
या प्रकरणातील आरोपी सध्या जामिनावर बाहेर आले आहेत.
या केसचा अधिक तपास अद्याप सुरू आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (sushant singh rajput) 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरामध्ये मृतदेह आढळून आला होता.
यानंतर या प्रकरणातील ड्रग्ज केसमध्ये रियाचे नाव समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती.
रिया एक महिना तुरुंगात होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाची जामीन याचिका मंजूर केली होती.
या प्रकरणात रियाचा भाऊ शौविक यालादेखील अटक करण्यात आली होती.
शौविकला तीन महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने जामीन दिला होता.
सध्या हे सर्वजण जामिनावर बाहेर आहेत.

Related Posts