IMPIMP

Rishi Sunak | ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ऋषी सुनक यांचे मोठे निर्णय

by nagesh
Rishi Sunak | recession in britain recession announced in britain rishi sunak government present emergency budget tax hiked

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – ब्रिटिश सरकार (British Government) आर्थिक मंदीच्या भोवऱ्यात अडकली असून, त्यातून बाहेर येण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी ५५०० कोटी पौंडचे आर्थिक साहाय्य जाहीर केले आहे. अर्थसंकल्पाबरोबर OBR (ऑफिस फॉर बजेट रिस्पॉन्सिबिलिटी) चा अहवालही प्रसिद्ध केला आहे. यानुसार रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे इंधनासह अन्य वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला (British Economy) मोठा फटका बसला आहे. सध्याच्या परिस्थितीत 2024 पर्यंत सुधारणा होण्याची शक्यता नाही, असे अहवालात म्हटले आहे.

 

कोरोना आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine war) संपूर्ण जग महागाईच्या संकटातून जात आहे. अनेक देश महागाई विरोधात पावले उचलत आहे. यातून एकेकाळी जगावर राज्य करणारे ब्रिटन सुद्धा स्वतःला वाचवू शकले नाही. किंबहुना इतरांच्या एक पाऊल पुढे जात ब्रिटिश सरकारने देशात आर्थिकमंदी जाहीर केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुरुवारीच जेरेमी हंट (Jeremy Hunt) यांनी सरकारचा आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
जेरेमी हंट ब्रिटनचे नवचर्चित पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत.
त्यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात करांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
ऊर्जा कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्स 25 टक्क्यांवरून वाढवून 35 टक्के केला आहे विंडफॉल टॅक्स (windfall tax) अशा कंपन्या किंवा उद्योगांवर लावला जातो ज्यांना विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीचा तात्काळ फायदा होतो). डिझेल जनरेटरवर 45 टक्के तात्पुरता कर लावण्यात आला आहे. आता वर्षाला 1.25 लाख पौंड कमावणाऱ्या लोकांना सर्वोच्च आयकराच्या कक्षेत घेतले गेले आहे, जो 40 टक्के इतका आहे. तसेच 2025 पासून इलेक्ट्रिक वाहनांवर उत्पादन शुल्क लावले जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Rishi Sunak | recession in britain recession announced in britain rishi sunak government present emergency budget tax hiked

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘भाजपाकडून केवळ मतांच्या राजकारणासाठी वीर सावरकरांचा वापर’ – संजय राऊत

Mumbai Railway Megablock | लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी; मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर 27 तासांचा मेगाब्लॉक

Pune Crime | अंबामातेची चांदीची मुर्ती, हार, निरांजन आणि दागिने चोरणाऱ्या मोलकरीणीला कोरेगाव पोलिसांकडून अटक

Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?

 

Related Posts