IMPIMP

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; हेज् अँड सॅचे संघ, पुणे पोलिस संघांची विजयी कामगिरी !!

S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak' Championship T20 Cricket Tournament; Winning performance of Hayes & Sache team, Pune Police teams !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- S. Balan Cup T20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत हेज् अँड सॅचे संघाने (Hayes & Sachs Team) आणि पुणे पोलिस या संघांनी (Pune Police Team) आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली. (S. Balan Cup T20 League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर (Shinde High School Ground, Sahakarnagar) सुरू असलेल्या या स्पर्धेत परिक्षीत याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुणे पोलिस संघाने औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १२४ धावांनी सहज धुव्वा उडविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे पोलिस संघाने २२१ धावांचा डोंगर उभा केला. करण शहा याने ६६ धावांची तर, सिध्दांत आढतराव याने ५० धावांची खेळी केली. तसेच परिक्षीत (३० धावा) आणि प्रशांत गायकवाड (३२ धावा) यांनी धावांचे योगदान संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानासमोर व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ९७ धावांवर गडगडला. परिक्षीत याने १८ धावात ४ गडी टिपले आणि सामनावीर किताब पटकावला.

 

दत्ता पवार याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हेज् अँड सॅचे संघाने हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ७ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २० षटकात १२६ धावा धावफलकावर लावल्या. आदित्य रावत (नाबाद ४६ धावा) आणि दत्ता पवार (नाबाद ४२ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर हेज् अँड सॅचे संघाने हे आव्हान १४.१ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. (S. Balan Cup T20 League)

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुणे पोलिसः २० षटकात ८ गडी बाद २२१ धावा (करण शहा ६६ (३५, ७ चौकार, ४ षटकार), सिध्दांत आढतराव ५० (३१, ६ चौकार, २ षटकार),
परिक्षीत ३०, प्रशांत गायकवाड ३२, विजय जाधव ३-१९) वि.वि. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १४.४ षटकात १० गडी बाद ९७ धावा
(प्रतिक ३१, आर्दश शुक्ला ३०, परिक्षीत ४-१८, अमर सालवे २-२३); सामनावीरः परिक्षीत;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद १२६ धावा (संदीप शिंदे ३२, स्वप्निल फुलपगार २५, मितेश सांगत २१,
दत्ता पवार २-१९, विश्‍वजीत जगदाळे २-१६) पराभूत वि. हेज् अँड सॅचेः १४.१ षटकात ३ गडी बाद १२९ धावा
(आदित्य रावत नाबाद ४६, दत्ता पवार नाबाद ४२, विश्‍वजीत जगदाळे १४, संदीप शिंदे १-१३); सामनावीरः दत्ता पवार;

 

 

Web Title :- S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament; Winning performance of Hayes & Sache team, Pune Police teams !!

 

हे देखील वाचा :

New Gold Hallmark | सोने खरेदी-विक्रीच्या नियमात आजपासून होणार बदल; नवीन हॉलमार्क होणार लागू

IPL 2023 | आज रंगणार आयपीएलचे डबल हेडर सामने; ‘हे’ 4 संघ भिडणार आमने-सामने

Buldhana Crime News | 26 वर्षीय तरुणीचा ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू; बुलढाणामधील घटना