IMPIMP

Salman Khan | ‘भाईजान’ सलमान खानला ‘सर्पदंश’ ! 7 तास हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट; पनवेलच्या फार्म हाऊसमधील घटना

by nagesh
Salman Khan | bollywood actor salman khan bitten by a snake at panvel farm house

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेता सलमान खानबाबत (Salman Khan) खळबळजनक बातमी समोर आली आहे. काल रात्री सलमान खानला (Salman Khan) सापाने दंश केला आहे. ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसवर होता. मात्र, सलमानची प्रकृती आता ठिक असल्याचे सांगितले जात आहे. त्याला रात्री उशीरा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.

25 डिसेंबरची रात्री सलमान खानसाठी वेदनादायी ठरली. काल रात्री सलमान खानला साप चावला. पनवेल येथील फार्म हाऊसवर (panvel farm house) सापानं अभिनेता सलमानला चावलं. त्यानंतर तात्काळ सलमान खानला हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट करण्यात आलं. उपचारासाठी सलमान खानला नवी मुंबई येथील एम.जी.एम. हॉस्पीटलमध्ये (M.G.M. Hospital) दाखल करण्यात आलं होतं.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान (Salman Khan) पनवेल फार्मवर मित्राचा वाढदिवसा साजरा करत होता. गप्पा मारत असताना सलमानच्या हाताला काहीतरी टोचल्यासारखं झालं. त्यानंतर सलमाननं परिसरावरून नजर फिरवल्यास त्यास साप दिसला. मदतीसाठी त्यानं लागलीच आवाज दिला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सलमान रूग्णालयात दाखल पोहचला. सुमारे 6 ते 7 तास रूग्णालयात राहिल्यानंतर सलमान खानला डिस्चार्ज देण्यात आला.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानचं फार्म हाऊस मोठं आहे. परिसरात घनदाट जंगल आहे. यापुर्वी देखील सलमानला फार्म हाऊसजवळ साप दिसले होते. त्यानंतर फार्म हाऊसची देखभाल करणार्‍यांना त्याने सावध देखील केले होते. सलमान खानला पहिल्यांदाच फार्म हाऊसवर साप चावला आहे.
दरम्यान, चावलेला साप हा विषारी नसल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानची प्रकृती आता तंदुरूस्त आहे.

Web Title :- Salman Khan | bollywood actor salman khan bitten by a snake at panvel farm house

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook Page for every update

हे देखील वाचा :-

Vastu Tips | ‘हे’ 7 संकेत सांगतात की बदलणार आहे तुमचे नशीब, तुमच्या घरी होणार आहे पैशांचा पाऊस

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

GST | सोसायटीमध्ये राहत असाल तर मेंबर-फीमध्ये 2017 पासूनचा ‘जीएसटी’ द्यावा लागेल, 1 जानेवारीपासून नियम आणतंय सरकार, जाणून घ्या

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! RTI कार्यकर्ता सुधीर आल्हाटची रवानगी पोलिस कोठडीत

White Hairs Problem Solution | तुमचेही केस पांढरे होतात तर जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय, केस काळेकुट्ट अन् दाट होतील; जाणून घ्या

Related Posts