IMPIMP

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

by nagesh
Sambhajiraje Chhatrapati | new direction new option sambhaji raje may be left to bjp big announcement on may 12 in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रपती नियुक्त खासदार (President-Appointed MP) म्हणून मुदत संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती
(Sambhajiraje Chhatrapati) हे आता नव्या राजकीय घोषणेच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा उभारणारे
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) लवकरच नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी भाजपचे
(BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
असून संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यसभेच्या खासदारकीची टर्म संपत आल्यामुळे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, माझी भूमिका 12 मे रोजी स्पष्ट करणार आहे. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही, असे नाही पण जे काही बोलायचे ते मी 12 तारखेला बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

त्यानंतर आता पुण्यात 12 मे रोजी मेळावा जाहीर करण्यात आला आहे.
या मेळाव्यात संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे पोस्टर व्हायरल झाले आहे.
या पोस्टरवर ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी… नवी दिशा, नवा विचार आणि नवा पर्याय..’
असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे संभाजीराजे हे भाजपकडून पुन्हा खासदार होऊन जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | new direction new option sambhaji raje may be left to bjp big announcement on may 12 in pune

 

हे देखील वाचा :

Stock To Buy Today | 310 रुपयांच्या पुढे जाईल टाटा ग्रुपचा हा मल्टीबॅगर शेअर, आता स्वस्तात मिळत आहे स्टॉक, एक्सपर्टने म्हटले – खरेदी करा

Neha Sharma Superhot Look | नेहा शर्माच्या हॉटनेसमुळं चुकला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका, पाहा व्हायरल फोटो..

Post Office Scheme | एकरकमी 10 लाख करा जमा, मॅच्युरिटीवर गॅरंटेड मिळतील 13.90 लाख; कॅलक्युलेशन

 

Related Posts