IMPIMP

Sambhajiraje Chhatrapati | स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार, संभाजीराजेंची मोठी घोषणा (व्हिडिओ)

by nagesh
Sambhajiraje Chhatrapati | sambhajiraje chhatrapati on 2024 loksabha and vidhansabha election in swarajya first adhiveshan in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या स्वराज्य संघटनेचं (Swarajya Sanghatana) पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडले. या अधिवेशनात 2024 साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल (Election 2024) संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वराज्य संघटना राज्यातील सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या अधिवेशनात स्वराज्य संघटनेचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच संभाजीराजे यांच्या हस्ते स्वराज्य भवनाचं लोकार्पण करण्यात आले.

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, स्वराज्य यापुढे सक्षम पर्याय म्हणून येणार आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या तयारीला लागा. घाबरण्याची गरज नाही. माझा विश्वास आहे, सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारच. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे गुण घ्यायचे आहेत. आजचे काही प्रस्थापित लोक माजलेले आहेत. त्यांना माझा विरोध आहे. पण, चूक त्यांची नसून आपली आहे. कारण, आपण त्यांना निवडून देतो. नंतर माजल्यावर म्हणतो बघून घेऊ. मात्र, अगोदरच का निवडून देता? असा सवाल संभाजीराजेंनी केला.

 

 

संभाजीराजे म्हणाले, राजकारणी आपला खेळ करायला लागेल आहेत. तेच राजकारणी, तेच खोटं बोलणं आणि ती चर्चा सुरु आहे. वेळप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांची नावं घेतली जातात. या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी बाहेर पडायचं आहे. यासाठीच हे अधिवेशन (First Convention) आहे. आपण देशात अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. पण तरीही शिक्षणाची काय परिस्थिती आहे. शिक्षणाचा बाजारीकरण झालं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं आता फक्त त्यांच्या धोरणावर बोललं जात आहे, असं म्हणत त्यांनी राजकीय धोरणांवर नाराजी व्यक्त केली.

 

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज सर्व शिलेदार पुण्यात आले आहेत. माझ्या जीवनातील आज सर्वात मोठा प्रसंग आहे.
आज आपलं पहिलं अधिवेशन होत आहे.
मागच्या वर्षी आपल्या संघटनेची घोषणा मी केली आणि केवळ आठ महिन्यात स्वराज्य संघटना उभी राहिली.
पक्षाची संघटनेची बांधणी कुठून सुरु करायची हा प्रश्न होता.
आपली कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या इथं सुरु केलेली संघटनेची पहिली शाखा तुळजापुरात काढली.
गाव तिथं शाखा आणि घरोघरी हा संकल्प घेऊन राज्यभर फिरलो. संघटना वाढवणे केवळ हाच उद्देश असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मला अनेक लोक विचारत होते, स्वराज्यचं ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह काय आहे? पण आम्हाला सर्वांना वाटलं,
स्वराज्य नावातच एवढी ताकद आहे, की त्याला ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह ठेवण्याची गरज नाही.
छत्रपती शिवाजी राजांनी स्वराजाच सुराज्य केलं आणि आज ही संघटना स्थापन करताना देखील तेच ध्येय
आम्ही ठेवलं आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.

Web Title : Sambhajiraje Chhatrapati | sambhajiraje chhatrapati on 2024 loksabha and vidhansabha
election in swarajya first adhiveshan in pune

Related Posts