IMPIMP

Sangli Crime | मिरजेत तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त; ‘पुष्पा’भाऊ कोण ?

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

मिरज : सरकारसत्ता ऑनलाइनSangli Crime | दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) चित्रपटामुळे रक्तचंदन (Red Sandalwood) सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी (Smuggling) दाखवण्यात आली असून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर त्याची विक्री केली जाते याबाबत चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) मिरज (Miraj) येथे तब्बल अडीच कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त (Seize) करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.31) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. कर्नाटकातून (Karnataka) आणलेले हे रक्तचंदन पुढे कोणाला दिले जाणार होते. आणि या गुन्ह्यातील खरा ‘पुष्पा’ कोण याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो मिरजमधील गांधी चौक पोलिसांनी (Gandhi Chowk police) पकडला. याप्रकरणी वाहन चालक यासीन इनायतउल्ला खान Yasin Inayatullah Khan (वय-45 रा. आद्रिकरणहळी, बेंगलोर, कर्नाटक याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. तब्बल एक टन रक्तचंदन कर्नाटकातून कोल्हापूरला (Kolhapur) नेले जात होते. पोलिसांना या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जकात नाक्यावर वाहनांची तपासणी करुन रक्तचंदनचा टेम्पो पकडला. (Sangli Crime)

 

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (SP Dixit Gedam) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारे एक वाहन सांगली शहरात येणार असल्याची माहिती मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या (Gandhi Chowk Police Station Miraj) अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास धामणी रोडवर (Dhamani Road) थांबलेल्या टेम्पोची तपासणी केली. पोलीस व वन विभागाने (Forest Department) केलेल्या कारवाईत रक्तचंदनाचे 32 ओंडके आढळले. हे रक्तचंदन फळांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरेटमागे लपवले होते. जप्त केलेले रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 2 कोटी 45 लाख 85 हजार इतकी आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण 2 कोटी 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी वाहन चालक यासीन खान याला अटक करुन, रक्तचंदन कुठून आणले, याची चौकशी सुरु आहे.
जप्त करण्यात आलेले रक्तचंदन पुढे कोणाला पाठवले जात होते, याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.
सांगली पोलिसांच्या तपासातून रक्तचंदनाच्या तस्करीची मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title :- Sangli Crime | sangli sandalwood worth rs 2 5 crore seized in miraj

 

हे देखील वाचा :

Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं ‘गहराइया’च्या प्रमोशनसाठी घातलेल्या व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Budget 2022 | मागच्या पेक्षा मोठा असेल अर्थसंकल्प, जाणून घ्या किती रुपये वाढवू शकते सरकार

EPFO Alert | कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आपल्या सदस्यांना केले सावध, ‘हे’ कागदपत्र शेयर केले तर वाढतील अडचणी

 

Related Posts