IMPIMP

Sanjay Rathod | …म्हणून औषध विक्रेता संघटना मला टार्गेट करत आहे, दोषींना सोडणार नाही; मंत्री संजय राठोड यांचा इशारा

by nagesh
Sanjay Rathod | sanjay rathod reaction on maharashtra state chemist and druggist association allegations of corruption

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (Maharashtra State Chemists & Druggists
Association) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay
Rathod) यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार (Corruption) होत असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीकडे राज्य सरकारने (State Government)
गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन उभा करुन बंद पुकारण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. यानंतर मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी
पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा केला आहे. तसेच अशा कुठल्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे सांगत दोषींना सोडणार नसल्याचा
इशारा राठोड यांनी दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबईत बोगस इंजेक्शन (Bogus Injection) विक्री प्रकरणात चौकशी झाली. यामध्ये जवळपास 40 विक्रेते दोषी आढळले आहेत. त्यांच्यासह औषध विक्रेत्यांच्या इतर गैरकृत्याविरुद्ध औषध प्रशासन विभागाने (Drug Administration Department) कारवाई प्रस्तावित केली आहे. केवळ याचाच राग मनात धरुन औषध विक्रेता संघटना मला टार्गेट करत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी सांगितले.

 

मुंबई मंत्रालयातील (Mumbai Mantralaya) उपसचिव विवेक कांबळी (Deputy Secretary Vivek Kambli) यांना लोह वाढविण्याचे इंजेक्शन ओरोफर (Orofer Injection) लावण्यात आले. मात्र हे इंजेक्शन बोगस असल्याने कांबळी यांचा मृत्यू झाला अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली. या तक्रारीची चौकशी केली असता भयंकर असे वास्तव समोर आले. बोगस इंजेक्शन तयार करुन विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने याबाबत विशेष समिती गठित करुन कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जवळपास 40 जणांवर याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे. हीच कारवाई टाळण्यासाठी औषध संघटनेच्या माध्यमातून दबाव निर्माण केला जात आहे. त्यातून ही तक्रार केली आहे. मात्र अशा कुठल्याही दबावाला बळी पडून दोषींना सोडणार नाही, अशी भूमिका संजय राठोड यांनी स्पष्ट केली.

 

औषध दुकानातून झोपेच्या गोळ्या, कफसिरफसारखे प्रतिबंधित औषध, स्टेरॉईड, नशेसाठी वापरली जाणाऱ्या औषधांची विक्री होत आहे.
य सगळ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी वेळोवेळी औषधी निरक्षकांकडून पडताळणी केली जाते. दोषींवर कारवाई केली जाते. अशा कारवाईतून अपिलात आलेली सात हजार प्रकरणे शासनाकडे प्रलंबित आहेत. यात तीन हजार प्रकरणात कायमचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांवर सुनावणी घेऊनच निकाल दिला जातो. सर्वच प्रकरणात स्थगिती द्यावी, अशी मागणी संघटना करत असेल तर ते चुकीचे आहे. मंत्रालयातही निकाल चुकीचा लागत आहे असे वाटत असेल तर त्यांना उच्च न्यायालयात (High Court) दाद मागण्याचा अधिकार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ते पुढे म्हणाले, दबाव निर्माण करुन जनतेच्या आरोग्याशी खेळ करण्याची मोकळीक मिळावी असे शक्य होणार नाही. ज्यांनी चूक केली, दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच सोमवारी किंवा मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवले जाईल.
त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील असेही संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

 

Web Title :-  Sanjay Rathod | sanjay rathod reaction on maharashtra state chemist and druggist association allegations of corruption

 

हे देखील वाचा :

Nashik MNS | नाशिक मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Political News | ‘अजित पवारांबाबत बातम्या पसरवण्यास राऊतांनी सुरुवात केली’, भाजप नेत्याचा संजय राऊतांवर निशाणा

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन संघाला विजेतेपद !!

Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

 

Related Posts