IMPIMP

Nashik MNS | नाशिक मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा तडकाफडकी राजीनामा

by nagesh
 Nashik MNS | dilip dater of mns resigns from city president by raj thackeray

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन   महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) राजीनामा नाट्यांसह पक्षा पक्षांमध्ये फूट पडत
असताना नाशिक (Nashik MNS) शहरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मनसे (Nashik MNS) शहराध्यक्ष दिलीप दातीर
(City President Dilip Dater) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला
आहे. मनसेतील अंतर्गत गटबाजीतून राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दातीर यांनी अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दीड वर्षापूर्वी जिल्ह्याच्या जबाबदारीतून मुक्त करत राज ठाकरे यांनी दातीर यांच्याकडे शहराची (Nashik MNS) जबाबदारी सोपवली होती. मात्र, अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. वैयक्तीक कारणाने आपण पदावरुन पायउतार होत असलो तरी राज ठाकरे आणि पक्षासोबत आजीवन निष्ठा ठेवणार असल्याचे दिलीप दातीर यांनी म्हटले आहे.

 

 

दिलीप दातीर यांनी काय म्हटलं पत्रात?

अत्यंत विनम्रपणे माझ्या वैयक्तिक कारणामुळे पदावरुन मुक्त करण्याची विनंती करत आहे. आपण माझ्यावर विश्वास टाकून पक्षात मला नाशिक पश्चिमची विधानसभा, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष सारखी मानाची पदे दिली. या पदांना मी माझ्या पूर्ण क्षमतेने, शंभर टक्के, अधिकच देण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी आपण माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत मला मोलाचे मार्गदर्शन किले. आपण मला जे प्रेम, आपुलकी व जिव्हाळा दिला आहे. त्यास अत्यंत भारावून गेलो आहे. मी जर माझ्या पदास पूर्ण न्याय देऊ शकत नसेल तर या पदावर राहण्याचा मला काही अधिकार नाही, असे मला वाटते. तरी आपणांस अत्यंत विनम्रपणे दरखास्त करतो की, आपण मला माझ्या शहराध्यक्ष पदावरुन पदमुक्त करावे, अशी विनंती दिलीप दातीर यांनी पत्रातून केली आहे.

 

 

Web Title :- Nashik MNS | dilip dater of mns resigns from city president by raj thackeray

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | ‘अजित पवारांबाबत बातम्या पसरवण्यास राऊतांनी सुरुवात केली’, भाजप नेत्याचा संजय राऊतांवर निशाणा

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन संघाला विजेतेपद !!

Pune PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Maharashtra Political News | ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले-‘अजितदादांची स्क्रिफ्टचे रायटर फडणवीस’

 

Related Posts