IMPIMP

Sanjay Raut | ‘माझा कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही तर…’; संजय राऊतांचं राणेंना प्रत्युत्तर

by nagesh
MP Sanjay Raut | shivsena leader sanjay rauts response to bjp leader narayan rane criticism

सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर भाजपच्या (BJP) नेत्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही (Narayan Rane) संजय राऊतांवर (Sanjay Raut) जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांचा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर डोळा असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. राणेंच्या या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

माझा कोणाच्य़ा खुर्चीवर नाहीतर शिवसेनेच्या विस्तारावर डोळा असल्याचं संजय राऊतांनी (Sanjay Raut) राणेंना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे. राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली.

 

त्यासोबतच 2024 पर्यंत शिवसेना (Shivsena) पक्ष दिल्लीच्या (Dehli) तख्तापर्यंत पोहोचलेला असेल. त्यावेळी बरेच लोक बेरोजगार झालेले असतील. मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

 

दरम्यान, राणेंनी पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले.
संजय राऊत यांचा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर डोळा असून राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रावादीकडून (NCP) सुपारी घेतली
असल्याचं घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

­नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे सर्वात लाचार मुख्यमंत्री (CM) असल्याचंही राणे म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | ‘I don’t have an eye on anyone’s chair ‘; Sanjay Raut’s reply to Narayan Rane

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 161 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau (ACB) Dhule | 45 हजारांची लाच घेताना कनिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Corona Update | दिलासादायक! पुणे शहरात आज 1165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts