IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊत यांना केलेली अटक बेकायदेशीर – विशेष सत्र न्यायालयाने ईडीला फटकारले

by nagesh
Sanjay Raut 'Shiv Sena will put up a big fight in the future' - Sanjay Raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथित गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणात
स्क्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) अटक केली होती. त्यावर आज (दि. 09) त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. यावेळी
न्यायलयाने ईडीला देखील सुनावले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना केलेली अटक बेकायदेशीर होती, असे मत विशेष पीएमएलए
(Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने नोंदविले.

 

सक्तवसुली संचलनालयाने (ED) आपल्या मर्जीतील आरोपी निवडले. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग (Rakesh Sarang), एचडीआयएल (HDIL), म्हाडा आणि सरकारी अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली नाही, असे देखील न्यायालयाने म्हंटले आहे. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचेही मत न्यायालयाने मांडले आहे. विशेष न्यायालयात ईडीने राऊतांच्या जामीनाला मंजुरी नाकारली होती. पण न्यायलयाने ईडीचे म्हणणे फेटाळत जामीन दिला होता. तसेच न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने देखील जामीनावरील याचिका फेटाळत संजय राऊत आणि प्रवीण राऊत (Praveen Raut) यांचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यामुळे ईडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत यांचा जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटात (Thackeray Group) आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राऊतांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच संजय राऊत यांचे बंधू यांनी आज आमच्यासाठी दिवाळी असल्याचे म्हंटले आहे.
शिवसैनिकांमध्ये हत्तीचे बळ आले आहे.
आज आमचा सेनापती मुक्त झाला आहे, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut arrest in illegal says pmla court slams ed

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | ‘सत्यमेव जयते! टायगर इज बॅक’, संजय राऊतांच्या सुटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया, जणून घ्या कोण काय म्हणाले?

Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)

Sanjay Raut | सत्यमेव जयते! सुनील राऊतांनी दिली संजय राऊतांच्या सुटकेवर प्रतिक्रिया

Sanjay Raut | ED ला न्यायालयाचा दणका, संजय राऊतांच्या जामिनाच्या स्थगितीची मागणी फेटाळली; होणार आजच सुटका

 

Related Posts