IMPIMP

Sanjay Raut | सत्यमेव जयते! सुनील राऊतांनी दिली संजय राऊतांच्या सुटकेवर प्रतिक्रिया

by nagesh
Sanjay Raut | shivsena mla sunil raut on pmla court granted bail sanjay raut

मुंबई: सरकारसत्ता ऑनलाईन – कथित गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यावर त्यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत संजत राऊत (Sanjay Raut) यांच्या सुटकेवर सुनील राऊत (Sunil Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि होता. महाराष्ट्रातील सर्व जनेतेचे आशीर्वाद संजय राऊत यांच्याबरोबर होते. न्यायव्यवस्थेने योग्य तो निर्णय संजय राऊतांच्या पारड्यात टाकून त्यांना न्याय दिला आहे. संजय राऊत आता साडेतीन महिन्यानंतर बाहेर येतील. त्यानंतर ते शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवण्यासाठी प्रयत्न करतील, असे सुनील राऊत (Sunil Raut) यावेळी म्हणाले.

 

संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला स्थगिती मिळावी, अशी मागणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) न्यायालयात केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळत राऊतांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे राऊत यांची आजच (दि. 09) सुटका होणार आहे. संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने जल्लोष केला आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांनी देखील संजय राऊत यांना
अभिनंदनासाठी फोन केला होता. संजय राऊत यांना जून महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने अटक केली होती.
त्यांच्यावर आणि त्यांचे बंधू प्रवीण राऊत (Praveen Raut) यांच्यावर गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहाराचे
आरोप ठेवण्यात आले होते. गेले 102 दिवस राऊत तुरुंगात होते.
आज त्यांना जामीन मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राऊतांच्या सुटकेवर प्रतिक्रिया दिली
आहे. आज आमच्यासाठी दिवाळीचा सण आहे. शिवसैनिकांमध्ये हजार हत्तींचे बळ आज आले आहे.
आजचा दिवस सर्वांसाठी महत्वाचा आहे. आमचा सेनापती परत आला आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Sanjay Raut | shivsena mla sunil raut on pmla court granted bail sanjay raut

 

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)

Sanjay Raut | न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत भाऊक

MP Sanjay Raut | सावधान रहो शेर आ रहा है, संजय राऊतांच्या जामीनानंतर भास्कर जाधवांचे विरोधकांना खुले चॅलेंज

 

 

Related Posts